Wednesday, June 3, 2026
Latest NewsMAHARASHTRAPUNETOP NEWS

पुढील 3 दिवस महाराष्ट्रातील ‘या’ जिल्ह्यांना पावसाचा इशारा

पुणे : देशात अनेक ठिकाणी मान्सूनपूर्व पावसाने हजेरी लावलेली आहे. आता राज्यातही मान्सूनपूर्व पाऊस कोसळण्याची चिन्हे आहेत. पुढील चार ते पाच दिवस पश्चिम महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यात मान्सूनपूर्व पावसाची शक्यता भारतीय हवामनशास्त्र विभागाने वर्तविली आहे. पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर, सांगली, सोलापूर तसेच विदर्भातील तुरळक ठिकाणी मान्सूनपूर्व पावसाची शक्यता आहे.

पुढील तीन दिवस राज्यातील अनेक भागात मान्सूनपूर्व पाऊस बघायला मिळणार आहे. भारतीय हवामान विभागाच्या मते पुढील तीन दिवस राज्यातील पश्चिम महाराष्ट्र कोकण आणि खानदेश मधील अनेक जिल्ह्यात पावसाची हजेरी बघायला मिळणार आहे.

भारतीय हवामान विभागाने दिलेल्या माहतीनुसार, पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर, सांगली, अहमदनगर, कोकणातील पालघर, रायगड, रत्नागिरी, ठाणे, सिंधुदुर्ग आणि मुंबई तसेच खानदेशातील जळगाव, धुळे, नंदुरबार तसेच विदर्भातील यवतमाळ या जिल्ह्यात पुढील तीन दिवस मान्सूनपूर्व पाऊस कोसळणार असल्याचा अंदाज आहे. दरम्यान कोकण आणि विदर्भात चार दिवस मेघगर्जना आणि विजेचा कडकडाटात पावसाची हजेरी बघायला मिळणार आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading