उद्धव ठाकरेंच्या पार्टनरचा कसाबशी संबंध; किरीट सोमय्यांचा गंभीर आरोप
पुणे : मुख्यमंत्री ठाकरे कुणाकुणाचे पार्टनर आहेत ? असा सवाल भाजपाचे किरीट सोमय्या यांनी पुण्यातील पत्रकार परिषदेत केला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पार्टनरचे कसाबशी संबंध आहेत असे गंभीर आरोप किरीट सोमय्या यांनी केले आहेत.
किरीट सोमन्या यांनी आज विविध मुद्द्यांवर भाष्य केले किरीट सोमय्या म्हणाले ,मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे मेहुणे पाटणकर यांच्यावरही सोमय्या यांनी गंभीर आरोप केले असून पाटणकरांचे विमल अग्रवाल यांच्याशी संबंध आहेत असा आरोप त्यांनी केला आहे. तसेच यशवंत जाधव हा उद्धव ठाकरे यांचा उजवा हात आहे, त्यांची १००० कोटी ची जागा असल्याचा आरोपही सोमय्यांनी केला.
नवाब मलिक चे संबंध दाऊदशी आहेत तर ठाकरे यांच्या पार्टनर चे संबंध कसाब पर्यंत आहेत. उद्धव, रश्मी, आदित्य, तेजस आणि त्यांचा मामा हे पार्टनर तरी नेमकं कुणाकुणाचे आहेत?असा सवाल किरीट सोमय्या यांनी केला आहे
हेमंत करकरे यांची हत्या कसाबने केली पण त्यांचं जॅकेट हे बुलेटप्रुफ होतं. मग हे जॅकेट नकली होतं आणि ते दिलं होतं विमल अग्रवाल यांनी. असा आरोप करत त्यांनी उद्धव ठाकरे यांचे कसाबशी कसे संबंध आहेत असेही किरीट सोमय्या म्हणाले.
यशवंत जाधव आणि विमल अगरवाल यांची एक कंपनी आहे आणि यशवंत जाधव हा उद्धव ठाकरे यांचा उजवा हात आहे, त्यांची १००० कोटी ची जागा आहे असा आरोप सोमय्या यांनी केला आहे. तसेच राष्ट्रवादीचे हसन मुश्रीफ यांनी मनी लॉंड्रींग केलं असून १५८ कोटींचे मनी लॉंड्रींग केल्याचा आरोप किरीट सोमय्या यांनी केला आहे.
अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांचे दाऊदशी संबंधित व्यक्तींशी संबंध असल्याचे उघड झाल्यानंतर शिवसेनादेखील मागे नाही, असा आरोप भाजपचे नेते किरीट सोमय्या पुण्यातील पत्रकार परिषदेत केला.
राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांच्या रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली येथील दोन रिसॉर्टवरही कारवाई सुरु असल्याचं किरीट सोमय्या यांनी सांगितलं. ते म्हणाले. अनिल परबचं काऊंट डाऊन सुरु झालं आहे. अनिल परबवरील कारवाईची उलटी गिनती सुरु झाली आहे. पर्यावरण मंत्रालयाने 31 जाने 2022 ला अनिल परब यांच्या दापोलीतील रिसॉर्ट पाडण्याचे आदेश दिले होते. केंद्र सरकारच्या पर्यावरण मंत्रालयाने महाराष्ट्र सरकारला नोटीस दिली आहे. 90 दिवसात अनिल परबांनी हे रिसॉर्ट पाडलं नाही. त्यामुळे मी रत्नागिरी जिल्हाधिकारी, महावितरण आदींना विनंती केली आहे की, परबांच्या दोन्ही रिसॉर्टचे वीज-पाणी कट करावी. 25 कोटींचा रिसॉर्ट आहे. प्रॉपर्टी टॅक्स तर दाखवला आहे. पण बांधकाम खर्च शून्य आहे. या प्रकरणी मनी लाँड्रिंग अंतर्गत तपास सुरु झाला आहे, असं किरीट सोमय्यांनी सांगितलं.
