Monday, June 15, 2026
Latest NewsPUNE

‘सोलापूर भूषण पुरस्कार’ रणजितसिंह डिसले यांना तर ‘पुणे रत्न कार्यवैभव पुरस्कार’ राहीबाई पोपरे यांना जाहीर

सोलापूर भूषण, पुणे रत्न पुरस्कार वितरण सोहळा येत्या २७ मे रोजी 
पुणे : जनकल्याण बहुउद््देशीय फाऊंडेशन पुणे तर्फे शुक्रवार, दिनांक २७ मे रोजी सायंकाळी ५ वाजता पद्मावतीजवळील लोकशाहीर अण्णाभाऊ साठे नाटयगृहात सोलापूर भूषण व पुणे रत्न पुरस्कार वितरण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. कार्यक्रमाला ज्येष्ठ साहित्यिक डॉ.श्रीपाल सबनीस, राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांसह अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष व माजी अप्पर पोलीस अधिक्षक शहाजीराव पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली.

पत्रकार परिषदेला मेघराजराजे भोसले, अभय ऐतवडेकर आदी उपस्थित होते.

संस्थेच्या पाचवा वर्धापनदिनानिमित्त आयोजित कार्यक्रमाला अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराजराजे भोसले, माजी अप्पर पोलीस महासंचालक प्रभात रंजन, सहपोलीस आयुक्त संजय शिंदे, माजी महापौर व राष्ट्रवादी कॉंग्रेसचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप, अप्पर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे, लिज्जत पापडचे कार्यकारी संचालक सुरेश कोते, इंडस सॉफ्टवेअर इंडस्ट्रीज इंडियाचे सीईओ अजित वाळे पाटील, चेतना जाठवडेकर आदी उपस्थित राहणार आहेत.

फाऊंडेशनच्या शोभा पाटील, सुशिला निंबाळकर, भाऊसाहेब निंबाळकर, प्राचार्य डॉ.सुधाकर जाधवर, अ‍ॅड.शार्दुल जाधवर, सचिन पाटील, सुरेखा जाधवर, केशरनानी घाडगे, शैलेंद्र पाटील आदींनी कार्यक्रमाचे नियोजन केले आहे. सोलापूर भूषण पुरस्काराने ग्लोबल टिचर पुरस्कारप्राप्त रणजितसिंह डिसले, शिल्पा फलफले, रोहित साठे, सोनाली कदम, सचिन कदम, सचिन चव्हाण, महेश भोरे, अभिनेत्री निता देव, काशिनाथ भतगुणकी, विजयसिंह चव्हाण, ज्ञानेश्वर भोसले यांना गौरविण्यात येणार आहे.

पुण्यासह महाराष्ट्रातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणा-या राष्ट्रपती पुरस्कार विजेत्या राहीबाई पोपरे, सुरेश कोते, रुक्मिणी भोसले, मृदुला काळे, युवा अभिनेते आशुतोष पाटील, सिनेनाटय लेखिका माहेश्वरी पाटील चाकुरकर, सिनेनाटय निर्माते अविनाश कोलते, सौंदर्यवती स्वाती हणमघर, विनायक देव, ममता तायडे, सिनेनाटय क्षेत्रातील प्रितम पाटील, स्वप्ना कुलकर्णी-राठोड, वसंत जगताप, कीर्तनकार ह.भ.प. नेहा साळेकर, चेरी टूर्सच्या संस्थापिका अर्चना नवघरे यांना पुणे रत्न कार्यवैभव पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. सन्मानचिन्ह, मानपत्र, पुणेरी व शिंदेशाही पगडी, एस.पीज फूडतर्फे खाद्यपदार्थांची भेटवस्तू, शाल, श्रीफळ असे पुरस्काराचे स्वरुप आहे.

 

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading