टीकाही सहन करायला तयार पण पोरं अडकू देणार नाही – राज ठाकरे

पुणे :महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची आज पुण्यामध्ये जाहीर सभा होत आहे.
एक खासदार उठतो, मुख्यमंत्र्यांना आव्हान देतो, टीकाही सहन करायला तयार पण पोरं अडकू देणार नाही” असं देखील राज ठाकरे यांनी म्हटलं आहे. यासोबतच “एक कुणीतरी खासदार उठतो आणि तिथल्या मुख्यमंत्र्यांना आव्हान देतो. शक्य तरी आहे का? याला अनेक पापुद्रे आहेत. काही तर असे आहेत, ज्यावर मला बोलताही येणार नाही. महाराष्ट्रातली माझी ताकद हकनाक तिथे अडकली असती. ती मला तिकडे सापडू द्यायची नव्हती. मी म्हटलं टीकाही सहन करायला तयार आहे, पण पोरं अडकू देणार नाही” असं म्हणत टीका केली आहे,

आत्ता जाग आली? राज ठाकरेंनी माफी मागावी वगैरे? 12-14 वर्षांनी आठवण आली का? तेव्हा ही माणसं कुठे होती? यातून चुकीचे पायंडे पडतायत हे सगळ्यांनी लक्षात ठेवावं. म्हणे राज ठाकरेंनी माफी मागितल्याशिवाय पाय ठेवू देणार नाही. विषय माफी मागण्याचाच आहे, तर गुजरातमध्ये अल्पेश ठाकूर नावाचे सदस्य आहेत. गुजरातमध्ये एका मुलीवर बलात्कार झाल्यानंतर तिथल्या उत्तर प्रदेश, बिहारच्या लोकांना मारलं, एका रात्रीत 10-15 हजार बिहारी, उत्तर प्रदेशवाल्यांना हाकलून लावण्यात आलं. तिथून कोण माफी मागणार आहे? असं देखील राज ठाकरे हे म्हणाले आहेत.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री या निवासस्थानाबाहेर हनुमान चालिसा पठण कऱण्याचा अट्टाहास केल्याने अडचणीत सापडलेल्या राणा दाम्पत्याला जेलमध्ये जावं लागलं होतं. त्यानंतरही त्यांनी हनुमान चालिसेचा मु्द्दा लावूनच धरला होता.
दोघांवर राज ठाकरेंनी पुण्यातल्या सभेतून टीका केली आहे. तसंच त्यांच्यावर आरोप- प्रत्यारोप करणारे संजय राऊत लेहमध्ये त्यांच्यासोबतच जेवत होते, यावरूनही राज ठाकरे यांनी टीका केली आहे.
राज ठाकरे म्हणाले, ज्यांना आपलं हिंदुत्व झोंबलं, ते आपल्या विरोधात एकत्र येतात, बाकी वेळी भांडत असतात. म्हणजे बघा ना ते राणा मातोश्रीवर हनुमान चालिसा पठण करण्यासाठी गेले होते. अरे मातोश्री बंगला काय मशीद आहे का?त्यांना अटक केली, मग ते आत होते, मधू इथे आणि चंद्र तिथे, मग ते एकत्र आले, त्यांना सोडलं. शिवसेनेकडून वाट्टेल ते बोलले, शिवसेना वाट्टेल ते बोलली. एवढ्या सगळ्या ड्रामानंतर हे दाम्पत्य आणि संजय राऊत एकत्र जेवताना दिसले. ज्यांच्यामुळे एवढं प्रकरण घडलं, त्यांच्यासोबत तुम्ही जेवताय, खांद्यावर हात ठेवून फिरताय. ह्यांचं हिंदुत्व ढोंगी आहे.

Leave a Reply

%d bloggers like this: