राज ठाकरे यांच्या सभेसाठी पोलिसांनी घातल्या ‘या’ 13 अटी

पुणे:महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांच्या 22 मे च्या पुण्यातील मेळाव्याच्या एक दिवस आधी शहर पोलिसांनी 13 अटी जारी केल्या आहेत. या अटी त्यांनी सार्वजनिक रॅलीदरम्यान पाळल्या पाहिजेत असे सांगण्यात आले आहेत.
पुणे पोलिसांनी जारी केलेल्या आदेशानुसार, घातलेल्या अटींचे उल्लंघन म्हणजे कायदेशीर कारवाईला आमंत्रण असणार आहे. उल्लेखनीय म्हणजे, मनसे प्रमुखांनी त्यांचा नियोजित अयोध्या दौरा पुढे ढकलला आहे, जो 5 जून रोजी नियोजित होता. आता या पुणे मेळाव्यानंतर अयोध्या दौऱ्याची तारीख जाहीर केली जाणार आहे.
या पुणे दौऱ्याआधी राज ठाकरे यांच्या पुण्यातील सभेचा टीझर लाँच झाला आहे. यामध्ये राज ठाकरे यांची हिंदूजननायक ही प्रतिमा पुन्हा एकदा अधोरेखित करण्यात आली आहे.
दरम्यान, महाराष्ट्रातील लाऊडस्पीकरच्या वादामध्ये मनसे प्रमुख केंद्रस्थानी आहेत. 12 एप्रिल रोजी मनसे प्रमुखांनी महाराष्ट्र सरकारला 3 मे पर्यंत मशिदींमधून लाऊडस्पीकर हटवण्याचा अल्टिमेटम दिल्यानंतर हा वाद सुरू झाला होता. 3 मे नंतर ज्या भागात ‘अजान’साठी लाऊडस्पीकरचा वापर केला जाईल, त्या ठिकाणी लाऊडस्पीकरवर हनुमान चालीसा वाजवण्याचे आवाहन राज ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना केले होते.

Leave a Reply

%d bloggers like this: