Thursday, June 18, 2026
Latest NewsMAHARASHTRAPUNETOP NEWS

राज ठाकरे यांची अयोद्धा दौर्‍यापूर्वी 22 मे ला पुण्यात सभा

पुणे : मनसे अध्यक्ष राज ठाकरे 5 जूनच्या अयोद्धा दौर्‍यापूर्वी पुण्यात ‘राज गर्जना’ करणार अशी माहिती देण्यात आली होती. त्यानुसार आता मनसे पुण्यात राज ठाकरेंच्या सभेसाठी तयारी करत आहे.
मनसे अध्यक्ष 22 मे दिवशी पुण्यामध्ये सभा संबोधित करणार आहे. पुण्यात गणेश कला क्रीडा मंचमध्ये संध्याकाळी 6 वाजता ही सभा होणार आहे. यापूर्वी 21 मेला नदीपात्रात सभा घेण्याचा मनसेचा मानस होता पण सध्या हवामान खात्याच्या अंदाजानुसार येत्या काही दिवसांत मान्सून बरसण्याची शक्यता असल्याने ही सभा रद्द झाली आहे. हे देखील

मनसे अध्यक्ष 22 मे दिवशी पुण्यामध्ये सभा संबोधित करणार आहे. पुण्यात गणेश कला क्रीडा मंचमध्ये संध्याकाळी 6 वाजता ही सभा होणार आहे. यापूर्वी 21 मेला नदीपात्रात सभा घेण्याचा मनसेचा मानस होता पण सध्या हवामान खात्याच्या अंदाजानुसार येत्या काही दिवसांत मान्सून बरसण्याची शक्यता असल्याने ही सभा रद्द झाली आहे. पुणे दौर्‍यातून राज ठाकरे काल काल रात्री उशिरा मुंबईला परतले. त्यामुळे पुण्यात सभा होणार की नाही? याची चर्चा रंगली होती पण मनसे प्र्वक्ते बाळा नांदगावकर यांनी दिलेल्या माहितीनुसार 22 मेला पुण्यात सभा होणार आहे. या सभेत राज ठाकरे कोणावर निशाणा साधणार? अयोद्धा दौर्‍यासाठी बृजभुषण सिंग या भाजपा खासदाराने दिलेल्या आव्हानाला प्रतिसाद देणार का? याकडे सार्‍यांचे लक्ष लागले आहे.

 

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading