Saturday, June 20, 2026
Latest NewsMAHARASHTRAPUNETOP NEWS

एकाच कुटूंबातील पाच जणींचा भाटघर धरणात बुडून मृत्यू; मृतांमध्ये चार सख्ख्या बहिणींचा समावेश

पुणे : एकाच कुटूंबातील पाच जणींचा भाटघर धरणात बुडून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना आज भोर तालुक्यातील नऱ्हे गावाचा हद्दीत घडल्याचे समोर आले आहे. भोर तालुक्यातील नऱ्हे येथील  भाटघर जलाशयात गुरुवारी (दि. १९) दुपारी १२ वाजता पोहण्यासाठी गेलेल्या पाच महिला भाटघर धरणात बुडाल्या आहेत. मृतांमध्ये चार सख्ख्या बहिणींचा समावेश आहे.

खुशबू लंकेश रजपूत (वय १९, रा. बावधन, पुणे), मनिषा लखन रजपूत (वय २०), चांदणी शक्ती रजपूत (वय २१), पूनम संदीप रजपूत (वय २२, तिघी रा. संतोषनगर हडपसर, पुणे) आणि मोनिका रोहित चव्हाण (वय २३, रा. नऱ्हे, ता. भोर) अशी या पाच जणींची नावे आहेत. यातील मनिषा रजपूत यांचा मृतदेह अद्यापही हाती न लागल्याने शोधकार्य सुरू आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, नऱ्हे (ता. भोर) येथील हरीभाऊ रामचंद्र चव्हाण यांच्या चार विवाहित मुली दोन दिवसापुर्वीच पुजेसाठी माहेरी आल्या होत्या. गुरुवारी सकाळी १२ च्या सुमारास या चौघी व चव्हाण यांच्या सून मोनिका रोहित चव्हाण या भाटघर जलाशयात पोहण्यासाठी गेल्या. परंतु सायंकाळी पाच वाजले तरी त्या घरी परत न आल्याने नातेवाईकानी जलाशय परिसरात शोध घेतला असता हा प्रकार समोर आला. दरम्यान पाच जणींपैकी चार जणींचे मृतदेह मिळाले असून अजूनही एकीचा शोध सुरू आहे.  

 

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading