Friday, October 23, 2026
Latest NewsPUNE

महिला पदाधिकाऱ्यांना अत्यंत निर्दयपणे मारहाण करणाऱ्यांवर कठोर कारवाई करा

महाविकासआघाडी मधल्या घटक पक्षा मधील पदाधिकाऱ्यांची मागणी

पुणे : बालगंधर्व रंगमंदिर येथे केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांच्या एका कार्यक्रमा दरम्यान सत्कार सुरू असताना भाजपचे कार्यकर्ते आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला पदाधिकाऱ्यांमध्ये राडा झाला. भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी राष्ट्रवादीच्या महिला पदाधिकारी वैशाली नागवडे आणि इतर महिलांना अमानुष मारहाण केली. याप्रकरणी वैशाली नागवडे यांनी डेक्कन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरून भाजपच्या तीन कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांच्यावर कठोर कारवाई करावी, अशी मागणी महा विकास आघाडी च्या पदाधिकाऱ्यांनी पोलीस आयुक्तांकडे केली आहे. आज दुपारी त्यांनी आयुक्तांची भेट घेतली.

दोन दिवसांपूर्वी केंद्रीय मंत्री स्मृती इराणी पुणे शहराच्या दौऱ्यावर आल्या असताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महिला विभागीय अध्यक्षा वैशाली नागवडे त्यांच्या समवेत आणखीन तीन महिला सहकार्यासमवेत “बालगंधर्व रंगमंदिर, पुणे” येथे महागाई विरोधातील निवेदन देण्याकरिता गेले असता भाजपचे पदाधिकारी भस्मराज तिकोणे, प्रमोद कोंढरे, मयूर गांधी यांनी महिला पदाधिकाऱ्यांना अत्यंत निर्दयीपणे मारहाण करून त्यांचा विनयभंग केला. वरील या तीन समाजकंटक व्यक्तींवर या पूर्वीही विविध प्रकारचे गुन्हे दाखल असून त्यांची पूर्वीपासून गुन्हेगारी प्रवृत्ती असल्याचे कळते.

सदर व्यक्तींवर वेळीच कठोर कारवाई न झाल्यास त्यांच्याकडून पुढील काळात फार मोठ्या प्रमाणावर समाज विघातक कृत्य घडण्याचा धोका आहे. तरी कृपया सदर वरील व्यक्तींवर कायद्यानुसार योग्य ती कडक कारवाई व्हावी, असे या निवेदनात नमूद करण्यात आले आहे. यावेळी  राष्ट्रवादी काँग्रेसचे पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगताप, काँग्रेसचे माजी आमदार व अध्यक्ष मोहन जोशी, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते प्रदीप देशमुख, नगरसेवक अविनाश बागवे, राष्ट्रवादी काँग्रेसच्या युवती अध्यक्ष सीमा सातपुते उपस्थित होत्या.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading