…अन् चिमूकल्यांना कळला अग्निशामकचा चित्तथरारक इतिहास
साईनाथ मंडळ ट्रस्टच्यावतीने जागतिक संग्रहालय दिनानिमित्त सफर संग्रहालयाची उपक्रम
पुणेः पानशेतच्या पूरावेळी आपत्कालीन बचावकार्यात वापरेलले रोल्स रॉयस डेनिस फायर इंजिन…ब्रिटिशकालीन हेल्मेट्स, विविध प्रकारचे फायर सूटस, नोजल, पाइप्स, रेस्क्यू बेल्टस, दिवे, फोम उपकरणे… अग्निशामक दलाच्या इतिहासापासून ते आजवर घडलेल्या चित्तथरारक घटनांमध्ये अग्निशामक दलातील जवानांच्या जिगरबाज कामगिरीचा लेखाजोखा मुलांनी घेतला.
जागतिक संग्रहालय दिनाच्या पूर्वसंध्येला बुधवार पेठेतील साईनाथ मंडळ ट्रस्टच्यावतीने ‘चला मुलांनो संग्रहालय पाहूया या’ उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी एरडंवणे येथील अग्निशामक संग्रहालय व कोथरूड येथील विक्रम पेंडसे सायकल संग्रहालय मुलांना दाखविण्यात आले. उपक्रमाचे उद्घाटन सायकल संग्रहालयाचे प्रमुख विक्रम पेंडसे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी अग्निशामक दलाचे स्टेशन ड्युटी ऑफिसर राजेश जगताप, सबऑफिसर संतोष कारले, आशुतोष पिंगळे, कैलास पवार, ऋषिकेश गित्ते, विठ्ठल सावंत, राजेंद्र भिलारे, साईनाथ मंडळ ट्रस्टचे अध्यक्ष पियुष शाह, नरेंद्र व्यास, शनी मारुती बाल गणेश मंडळाचे अध्यक्ष सचिन पवार आदी उपस्थित होते.
श्री शनि मारुती बाल गणेश मंडळ, नवज्योत मित्र मंडळ येरवडा, कसबा संस्कार वर्ग, नटरंग अकडमी, अजिंक्या मित्र मंडळ मॉडेल कॉलनी, विधायक मित्र मंडळ कसबा पेठ, एकता मित्र मंडळ सहकार नगर या मंडळातील व संस्थेतील मुले उपक्रमात सहभागी झाले. उपक्रमाचे यंदाचे दहावे वर्ष आहे.
पियुश शाह म्हणाले, जागतिक संग्रहालय दिनानिमित्त मुलांना पुण्यातील विविध संग्रहालयांची माहिती व्हावी म्हणून या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले.
हा उपक्रम दिनांक 17 ते 22 मे पर्यंत असून पुण्यातील लोकमान्य टिळक संग्रहालय, आगाखान पॅलेस संग्रहालय, राजा दिनकर केळकर संग्रहालय, ब्लेंडस ऑफ ग्लोरी क्रिकेट संग्रहालय, महात्मा फुले संग्रहालय ही संग्रहालय दाखविण्यात येणार आहेत.
गुंजन शेवते, अभिषेक मारणे, उमेश शेवते,अमित जाधव, सुधीर ढमाले, किरण सोनीवाल , अनिल दिवाणजी, जतीन पांडे, नरेंद्र व्यास, सुधन्वा रानडे यांचे उपक्रमाला विशेष सहकार्य लाभले.
वरील सर्व मंडळ व संस्था मधील मुले सहभागी होणार आहे
