Wednesday, June 3, 2026
Latest NewsPUNE

राज ठाकरेंचा उद्या पासून दोन दिवसीय पुणे दौरा; ‘वसंत मोरे अन् नाराजी नाट्याचा’ निकाल लावणार?

पुणे : मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे सध्या पुन्हा नव्या भूमिकेसह मैदानात उतरले असून, हिंदुत्वाचा मुद्दा घेऊन ते सध्या सक्रिय झाले आहे. त्यातच आता उद्या पासून राज ठाकरे पुन्हा एकदा दोन दिवसीय पुणे दौऱ्यावर येणार आहेत. पक्षातील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या बैठका ते घेणार आहेत. मनसेच्या रविवारी झालेल्या पदाधिकारी मेळाव्याचा आढावा राज ठाकरे घेणार असून, पुण्यातील सभेबाबत देखील चर्चा सुरु आहेत.

अद्याप सभेची तारीख ठरलेली नाही. गेल्या काही दिवसांपासून मनसे नेते वसंत मोरे हे नाराज असून, त्याची मोठी चर्चा सुरु आहे. आता राज ठाकरे स्वतः पुढाकार घेऊन पुण्यातील पदाधिकाऱ्यांमध्ये समन्वय घडवून आणतील आणि वसंत मोरेंच्या नाराजी नाट्याचा निकाल लावतील अशी देखील शक्यता आहे.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या या दौऱ्यात ते पुणे शहरातील पदाधिकाऱ्यांसोबत बैठक घेण्याची शक्यता आहेत. मागील काही दिवसांपासून राज ठाकरे यांनी हिंदुत्वाची भूमिका स्वीकारली तेव्हापासून मनसे कामाला लागली आहे. त्याच पार्श्वभूमीवर राज ठाकरे उद्यापासून दोन दिवस पुणे दौऱ्यावर येणार आहेत. पुणे शहरातील पदाधिकाऱ्यांमध्ये सध्या नाराजी नाट्य सुरु असून, त्याच मुद्यावर राज ठाकरे हा दौरा करतील अशी शक्यता आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading