fbpx
Friday, April 19, 2024
Latest NewsPUNETOP NEWS

राष्ट्रवादीच्या वैशाली नागवडे यांना मारहाण, भाजपच्या तीन कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल

पुणे : राष्ट्रवादीच्या वैशाली नागवडे यांना मारहाण करणाऱ्यांविरोधात डेक्कन पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
वैशाली नागवडे यांनी पोलीस स्टेशनमध्ये दिलेल्या तक्रारीवरुन हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
बसवराज तिकोने, प्रमोद कोंढरे, मयूर गांधी यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मारहाण करुन शिवीगाळ करणं, धमकावणं, अश्लील हातवारे करणे याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. काल पुण्यात महागाईच्या मुद्यावरुन जोरदार राजकीय राडा झाला. काँग्रेस आणि राष्ट्रवादीने महागाई विरोध आंदोलन केले. राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्या वैशाली नागवडे यांनी केंद्रीय मंत्री स्मृती ईराणी यांच्या कार्यक्रमस्थळी म्हणजेच बालगंधर्वमध्ये प्रवेश करण्याचा प्रयत्न केला. याठिकाणी राष्ट्रवादीच्या वैशाली नागवडे यांना मारहाण झाली.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading