Wednesday, June 3, 2026
Latest NewsPUNE

आंदोलन करण्याचा अधिकार प्रत्येकाला आहे – उपमुख्यमंत्री अजित पवार

पुणे :पुण्यात भाजपच्या एका कार्यक्रमात राष्ट्रवादीच्या एका महिला पदाधिकाऱ्याला मारहाण झाल्याची घटना समोर आली आहे यावर आता राष्ट्रवादी काँग्रेसकडून प्रतिक्रीया येत आहेत.
सर्वच पक्ष आंदोलन करतात. आमच्या विरोधात देखिल भाजप कार्यकर्ते आंदोलन करतात. केंद्रीय मंत्र्यांविरोधात शिवसेनेचे कार्यकर्ते आंदोलन करतात. आंदोलन हा राजकारणाचा अविभाज्य भाग आहे. ते सगळे पक्ष करतात. आंदोलन करण्याचा अधिकार प्रत्येकाला आहे. असे उपमुख्यमंत्री व पुण्याचे पालकमंत्री अजित पवार पुण्यातील आयोजित पत्रकार परिषदेत म्हणाले म्हणाले .
अजित पवार म्हणाले ,आंदोलनात कायदा हातात कोणी घेऊ नये. केंद्रीय मंत्र्यांना संरक्षण देणे हे पोलिसांचे कर्तव्य आहे. ते काम पोलीस करत आहेत. असंही अजित पवार म्हणाले.
पुण्यातील महिला पदाधिकाऱ्याला झालेल्या मारहाणी संदर्भात माझे बोलणे फोनवरून संभाषण पण झाले असून असल्याची माहिती अजित पवार यांनी दिली.
मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे परत पुण्यात सभा घेणार आहेत. त्यावर अजित पवार म्हणाले, राज्यात शांतता राखण्याचे काम विरोधी पक्षांनी करावे. असे अजित पवार म्हणाले.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading