Wednesday, June 3, 2026
Latest NewsPUNE

राष्ट्रवादीच्या महिला पदाधिकाऱ्यास भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी केली मारहाण

पुणे: केंद्रीय मंत्री स्मृती इराणी आज पुणे दौऱ्यावर होत्या. बालगंधर्व रंगमंदिर याठिकाणी एका पुस्तकाचे प्रकाशन त्यांच्या हस्ते झाले. परंतु या ठिकाणी झालेल्या कार्यक्रमाला गालबोट लागलं आहे.
स्मृती इराणी बालगंधर्व सभागृहात आल्यावर त्या ठिकाणी घोषणाबाजी करणाऱ्या एका महिलेला भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी मारहाण केली. घोषणाबाजी करणारी महिला राष्ट्रवादी काँग्रेसची पदाधिकारी आहे. वैशाली नागवडे असे या महिलेचे नाव आहे.
याप्रकरणी अधिक माहिती अशी की, सकाळ पासून पुणे दौऱ्यावर असलेल्या स्मृती इराणी यांना राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसने विरोध केला आहे. महागाईवरून त्यांनी केलेलं जुने विधान धरून या दोन्ही पक्षांनी त्यांच्या विरोधात आंदोलन केले. जे डब्ल्यू मॅरिएट या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी हॉटेलमध्ये घुसण्याचा प्रयत्न केला. तर बालगंधर्व रंगमंदिर याठिकाणी काँग्रेसच्यावतीने धरणे आंदोलन करण्यात आले.
सायंकाळी साडेपाचनंतर स्मृती इराणी या बालगंधर्व येथील कार्यक्रमाला उपस्थित राहिल्या. या ठिकाणी त्यांचा सन्मान होत असतानाच बाल्कनीत बसलेल्या काही महिलांनी घोषणा देण्यास सुरुवात केली. त्यानंतर त्या ठिकाणी एकच गोंधळ उडाला. घोषणा देणाऱ्या महिलांना भाजपच्या पुरुष पदाधिकाऱ्यांनी मारहाण केली. पोलीस बंदोबस्तात त्याठिकाणी त्यांना बाहेर काढण्यात आले आणि त्यानंतर डेक्कन पोलीस ठाण्यात नेण्यात आले. पुढील तपास डेक्कन पोलिस करत आहेत.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading