साहित्य सम्राट आण्णा भाऊ साठे साहित्य संमेलनाची ग्रंथदिंडीने उत्साहात सुरुवात

पुणे : साहित्यसम्राट अण्णा भाऊ साठे साहित्य संमेलनानिमित्त महात्मा फुले वाडा ते राजश्री शाहू संमेलन नगरी(सावित्री बाई फुले स्मारक ) ग्रंथदिंडी काढण्यात आली त्यावेळी कामगार नेते व ज्येष्ठ समाजसेवक डॉ.बाबा आढाव यांनी महात्मा फुले यांच्या अखंडाचे गायन करून सुरुवात केली . त्यांनतर ग्रंथ दिंडीचे पूजन डॉ.बाबा आढाव ,माजी मंत्री रमेश बागवे ,संमेलनाध्यक्ष विठ्ठल भंडारे यांनी केले.
या ग्रंथदिंडी अतिशय उत्साहात निघाली .महात्मा फुले , डॉ .बाबासाहेब आंबेडकर ,राजश्री शाहू ,आण्णा भाऊ साठे आणि महापुरुषांचे प्रतिमांची मिरवणूक काढण्यात आली . यावेळी आण्णा भाऊ साठे यांच्या विचारांचे घोष वाक्य घेऊन लोक सहभागी झाले होते .या दिंडीत वारकरी संप्रदायाचे महाराज ज्येष्ठ किर्तनकार माधवराव डोंगरे व वारकरी समुदाय सहभागी झाले होते .सुरुवातीला महाराष्ट्रतील विविध भागातील हलगी वादक वादन करीत होते .त्यापाठोपाठ वारकरी त्यामागे ग्रंथदिंडी आणि पाठीमागे सहभागी लोक मोठ्या प्रमाणात सहभागी झाले होते.

संमेलनाध्यक्ष विठ्ठल भंडारे ,ज्येष्ठ कामगार नेते डॉ.बाबा आढावा,माजी मंत्री रमेश बागवे ,मुक्ता साळवे साहित्य परिषद संस्थापक व संमेलनाचे आयोजक सचिन बगाडे,,लहुजी वस्ताद साळवे स्मारक समिती चे अध्यक्ष ( महाराष्ट्र शासन)विजयबापू डाकले , स्वागताध्यक्ष अविनाश बागवे ,मुक्ता साळवे साहित्य परिषदेचे अध्यक्ष सोपान खुडे , ,ज्येष्ठ ग्रामीण साहित्यिक जयवंत अवघडे,हनुमंत साठे ,इतिहास संशोधक प्रा.सुहास नाईक ,ज्येष्ठ सामाजिक नेते अंकल सोनवणे ,पुणे शहर जिल्हा मातंग समाज सचिव संजय केंदळे,लेखक ,चित्रपट दिग्दर्शक सुरेश पाटोळे , पटकथा लेखक बाळ बारस्कर ,किर्तनकार माधवराव डोंगरे ,ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अंकल सोनवणे संमेलनाचे निमंत्रक
निमंत्रक अनिल हतागळे,रवी पाटोळे ,निलेश वाघमारे ,सुरेखाताई खंडाळे , प्रा.बबिता लोंढे ,नंदा गवळी
यासह पुणे शहरातील महाविद्यालयीन विद्यार्थी , महीला ,युवक व विविध सामाजिक ,राजकीय संघटनाचे कार्यकर्ते साहित्यसम्राट आण्णा भाऊ साठे साहित्य संमेलन निम्मित आयोजित ग्रंथदिंडी मध्ये मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

Leave a Reply

%d bloggers like this: