Saturday, October 24, 2026
Latest NewsMAHARASHTRATOP NEWS

महाराणा प्रतापसिंह यांची जयंती २५ मे ऐवजी २ जून रोजी साजरी होणार

मुंबई : सन २०२२ मध्ये राष्ट्र पुरुष, थोर व्यक्ती यांची जयंती व राष्ट्रीय दिन साजरे करण्यासंदर्भात दिनांक ३१ डिसेंबर २०२१ रोजी परिपत्रक काढण्यात आले होते. त्यानुसार महाराणा प्रतापसिंह यांची जयंती तिथीनुसार बुधवार दिनांक २५ मे २०२२ रोजी साजरी करण्यात येणार होती. ती आता २५ मे ऐवजी २ जून २०२२ रोजी साजरी होणार आहे.

शासनाने दिनांक ५ मे २०२२ रोजी शुध्दीपत्रक काढले असून त्यानुसार महाराणा प्रतापसिंह यांची जयंती तिथीनुसार २ जून २०२२ रोजी साजरी करण्यात येणार आहे. विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी यांनी त्यांच्या विभागातील, जिल्ह्यातील सर्व शासकीय, निमशासकीय कार्यालयात महाराणा प्रतापसिंह यांची ( तिथीनुसार ) जयंती आयोजित करण्याबाबत आवश्यक त्या सूचना निर्गमित करून त्याच्या अंमलबजावणीबाबत योग्य ती कार्यवाही करावी, असे सामान्य प्रशासन विभागाने शुद्धीपत्रक जारी केले आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading