Friday, June 19, 2026
Latest NewsPUNETOP NEWS

गिरीश बापट यांच्यावर लक्ष ठेवणे आम्हाला शक्य झालं नाही- शरद पवार

पुणे : पुण्यात अनेकवेळा आम्ही अनेक जागा जिंकल्या. पण मला अजून लक्षात आलं नाही की गिरीश बापट कुठेही उभे राहतात अन निवडून येतात एकदा गिरीष बापट कसब्यातून उभे राहिले, आम्ही ठरवलं त्यांच्यावर लक्ष ठेवायचं, पण ते काय आम्हाला शक्य झालं नाही अशी आठवण देखील पवार यांनी सांगितली. आज पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अंकुश काकडे यांच्या ‘हॅशटॅग पुणे’ या पुस्तकाचे प्रकाशन शरद पवार यांच्या हस्ते झाले. यावेळी ते बोलत होते. यावेळी पुण्याचे खासदार गिरीष बापट उपस्थित होते.

एक गंमती जमतीचा, आठवणीचा असा हा आजचा सोहळा आहे. महापालिकेत काम करताना अनेक गंमतीदार किस्से घडतात असेही पवार म्हणाले. कोणी कधी काय काम सांगेल याचा भरवसा नसतो, हे पुणे शहराचं एक वैशिष्ट्य असल्याचे पवार म्हणाले. गिरीश बापट, अंकुश काकडे आणि शांतीलाल सुरतवाला यांची मैत्री महापालिकेत प्रसिध्द होती .असेही शरद पवार यांनी सांगितले.

राष्ट्रवादी अध्यक्ष शरद पवार यांनी पुण्यातील बदलत्या घडामोडींवरसुद्धा लक्ष वेधले आहे. शरद पवार म्हणाले त्या काळातील पुणे आणि आताचे पुणे यामध्ये फार मोठा बदल झाला आहे. आता पुणे आणि पिंपरी चिंचवड या दोन्ही शहरांची लोकसंख्या जवळपास ७० लाख आहे. एवढ्या लोकसंख्येचे अनेक प्रश्न प्रलंबित आहे. तसेच पुण्यात छोटे-मोठे असे १ कोटीपेक्षा जास्त कारखाने आहेत. शैक्षणिक हब तसेच रोजगार उपलब्ध करुन देणारे असे पुणे महत्त्वाचे शहर असल्याचे शरद पवार म्हणाले.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading