fbpx
Thursday, April 25, 2024
Latest NewsPUNE

पीएमपीएमएलचे वाहतूक नियंत्रक काळुराम लांडगे यांना महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाचा गुणवंत कामगार पुरस्कार

पीएमपीएमएलचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक लक्ष्मीनारायण मिश्रा यांच्या हस्ते काळे यांचा सत्कार

पुणे : पुणे महानगर परिवहन महामंडळात वाहतूक नियंत्रक पदावर कार्यरत असलले श्री. काळुराम लांडगे यांना महाराष्ट्र
शासनाच्या 'महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाचा' चा "गुणवंत कामगार पुरस्कार" मिळाल्याबद्दल पीएमपीएमएलचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक  लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी त्यांचा सत्कार केला.
महाराष्ट्र शासनाच्या 'महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाचा' सन – २०१९ चा गुणवंत कामगार पुरस्कार
मिळाल्याबद्दल त्यांचा समाजामध्ये व काम करीत असलेल्या आस्थापनेमध्ये जबाबदार घटक म्हणून त्यांनी बजावलेल्या
कौतुकास्पद कामगिरीच्या सन्मानार्थ "गुणवंत कामगार कल्याण पुरस्कार" दि. १९ एप्रिल २०२२ रोजी मुंबई येथे आयोजित केलेल्या कार्यक्रमात ग्रामविकास व कामगार मंत्री हसन मुश्रीफ व कामगार राज्यमंत्री बच्चु  कडु यांचे हस्ते २५ हजाराचा धनादेश, प्रशस्तीपत्र व सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले होते.

याबद्दल पीएमपीएमएलचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक  लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी काळूराम लांडगे यांचा सत्कार केला. याप्रसंगी सहव्यवस्थापकीय संचालक डॉ. चेतना केरूरे, मुख्य कार्यकारी अधिकारी प्रज्ञा पोतदार, जनरल मॅनेजर (अॅडिमन अॅण्ड एच. आर.)  सुबोध मेडसीकर, कामगार व जनता संपर्क अधिकारी  सतिश गाटे उपस्थित होते.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading