fbpx
Saturday, April 27, 2024
Latest NewsPUNE

विमानांचे भव्य प्रदर्शन

पुणे : एलेरिओस एरो क्लब, शास्त्रवाहिनी आणि BAE SYSTEMS ने 5 मे ते 8 मे 2022 या कालावधीत राजा रविवर्मा आर्ट गॅलरी, घोले रोड, पुणे येथे ‘सायन्स ऑफ फ्लाइट’ या विमानप्रदर्शनाचे आयोजन केले आहे.

Air Marshal अरुण गरुड (PVSM, VSM) (निवृत्त) यांनी प्रदर्शनाचे उद्घाटन केले. Cdr. टी आर ए नारायणन (निवृत्त) आणि Grp. Cpt. सुहास फाटक (निवृत्त) हे देखील उद्घाटनासाठी उपस्थित होते.

प्रदर्शनात मराठी आणि इंग्रजी दोन्ही भाषेत 75 माहितीपूर्ण तक्ते, अनेक विमानांची मॉडेल्स, विमानाचे सिम्युलेटर, वॉक-इन कार्यशाळा आणि खरेदी करण्यासाठी अनेक एरोमॉडेलिंग उत्पादने आहेत. हे प्रदर्शन सर्वांसाठी विनामूल्य असून 8 मे पर्यंत सकाळी 10 ते रात्री 8 पर्यंत खुले राहणार आहे.

तसेच, या प्रदर्शनाचा एक भाग म्हणून 7 मे रोजी दुपारी 3 ते 6 या वेळेत Aspects of Aviation या विषयावर चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले आहे ज्यात विमान क्षेत्रातील तज्ञ प्रेक्षकांना संबोधित करतील.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading