Tuesday, June 16, 2026
Latest NewsSports

बाबा रॉड्रिक्स अँड सन्स आयटीएफ एस200 वरिष्ठ टेनिस अजिंक्यपद स्पर्धेत केतन धुमाळ, नितीन कीर्तने, योगेश शहा यांना दुहेरी मुकुट 

पुणे : एमएसएलटीए व पीएमडीटीए यांच्या मान्यतेखाली होत असलेल्या बाबा रॉड्रिक्स अँड सन्स आयटीएफ एस200(गुण) वरिष्ठ टेनिस अजिंक्यपद स्पर्धेत 35वर्षांवरील गटात पुण्याच्या केतन धुमाळ, 45वर्षांवरील गटात नितीन कीर्तने, तर 65वर्षांवरील पुरुष एकेरीत योगेश शहा यांनी एकेरी व दुहेरी या दोन्ही गटात विजेतेपद पटकावत दुहेरी मुकुट संपादन केला.   .

एमएसएलटीए स्कुल ऑफ टेनिस म्हाळुंगे बालेवाडी येथे सुरु असलेल्या या स्पर्धेत 35वर्षांवरील पुरुष गटात अंतिम फेरीत केतन धुमाळ याने तिसऱ्या मानांकित अर्जुन उप्पलचा 6-2, 6-1 असा पराभव करून या गटाचे विजेतेपद पटकावले. दुहेरीत अंतिम लढतीत केतन धुमाळने अभिषेक ताम्हाणेच्या साथीत सुजय महादेवन व अर्जुन उप्पल या चौथ्या मानांकित जोडीचा 6-3, 6-2 असा सरळ सेटमध्ये पराभव करून विजेतेपद मिळवले.

45वर्षांवरील पुरुष एकेरीत अंतिम फेरीत अव्वल मानांकित नितीन कीर्तनेने दुसऱ्या मानांकित सुनील लुल्लाचा 6-0, 6-1 असा सहज पराभव करून विजेतेपद पटकावले. दुहेरीत अंतिम लढतीत नितीन किर्तने व प्रशांत सुतार यांनी सुनील लुल्ला व गगनदीप वासू यांचा 6-1, 6-0 असा पराभव करून विजेतेपदाचा मान पटकावला. 65वर्षांवरील पुरुष गटात अंतिम फेरीत अव्वल मानांकित योगेश शहा याने पाचव्या मानांकित एकनाथ किणीकरचा टायब्रेकमध्ये  7-6(2), 7-6(4) असा पराभव करून विजेतेपदाला गवसणी घातली.

स्पर्धेचे पारितोषिक वितरण स्पर्धेचे प्रायोजक बाबा रॉड्रिक्स, सुभाष सुतार, स्पर्धा संचालक डीएस रामा राव यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी आयटीएफ सुपरवायझर वैशाली शेकटकर आदी मान्यवर उपस्थित होते.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading