fbpx
Sunday, May 19, 2024
Latest NewsMAHARASHTRAPUNETOP NEWS

कोरेगाव भीमा प्रकरण: संभाजी भिडेंना जयंत पाटलांमुळे क्लीनचिट प्रकाश आंबेडकरांचा गंभीर आरोप

पुणे : भीमा कोरेगाव प्रकरणात संभाजी भिडेंना राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि राज्याचे मंत्री जयंत पाटील यांच्यामुळे क्लीचिट मिळाली असल्याचा गंभीर आरोप वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख अॅड.  प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे.

तपास अधिकाऱ्याने भिडेंना क्लीन चिट दिली. त्याने सर्वोच्च न्यायालयात जे प्रतिज्ञापत्र दिले ते वाचले नाही. यामुळे कोर्टाला कळाले की, संभाजी भिडे आणि मिलींद एकबोटे दोषी आहेत. कोणाच्यातरी सांगण्यावरुन तपास अधिकाऱ्याने भिडेंना क्लीनचिट दिली आहे. संभाजी भिडेंच्या पाया पडत असताना जयंत पाटील यांचा फोटो व्हायरल झाला होता यावरुन सगळं काही लक्षात घेतलं पाहिजे असे वक्तव्य प्रकाश आंबेडकर पुण्यात पत्रकाराशी बोलताना केलं आहे.

वंचित बहुजनच आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यावर गंभीर आरोप केला आहे. भीमा कोरेगाव हिंसाचार प्रकरणात शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे प्रमुख संभाजी भिडे यांना जयंत पाटील यांच्यामुळे क्लीन चिट मिळाली आहे. तपास अधिकारी संभाजी भिडे यांना क्लीन चिट देण्याच्या निष्कर्षापर्यंत कसा पोहोचला? न्यायालयात संभाजी भिडे यांचे नाव आरोपपत्रातून वगळण्याचा प्रयत्न झाला तर त्याला विरोध करण्यात येईल. राष्ट्रवादी काँग्रेसचा एक फोटो आहे. त्यामध्ये जयंत पाटील संभाजी भिडेंच्या पाया पडतात त्यामुळे सूत्र कुठून हालली हे लक्षात घेतलं पाहिजे. शरद पवार यांनी दावा केला की हे सगळं प्रकरण खोटं आहे. हा जो कांगावा करण्यात आला त्या काळी हा सगळा बोगस आहे. याचे सर्व कागदपत्र माझ्याकडे आहेत असे प्रकाश आंबेडकर यांनी सांगितले. 

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading