दुचाकी वाहनावरील हेल्मेट सक्तीचा दंड माफ करण्यासाठी बसपाच्या वतीने विभागीय आयुक्त यांना निवेदन
पुणे : जिल्हाधिकारी यांनी एक एप्रिल दोन हजार बावीस रोजी एक परिपत्रक काढले असून त्यामध्ये पुणे जिल्ह्यातील दुचाकी वाहनांवर हेल्मेट वापराबाबत दंड आकारू नये असे म्हटले आहे. त्याचे मुख्य कारण उन्हाळा असल्यामुळे दुचाकी वाहन वाहकांना हेल्मेटचा त्रास होतो. परंतु जिल्हाधिकारी पुणे यांनी काढलेल्या परिपत्रकाच्या अनुषंगाने पोलिस प्रशासनाने कुठलाही आदेश पाळला दिसत नाही.
पोलीस प्रशासनाने केलेल्या दंडात्मक कारवाई मुळे दि. 7 मे रोजी सदर विषयावर लोक न्यायालय आयोजित केलेले आहे. याबाबत विभागीय आयुक्त यांना बसपाच्या शिष्टमंडळाने दिनांक पाच मे रोजी निवेदन दिले आहे. विभागीय आयुक्त यांनी आश्वासन दिले की दि. 6 मे रोजी उपमुख्यमंत्री जिल्हाधिकारी पोलिस आयुक्त यांच्याशी चर्चा करून याबाबत निर्णय घेण्यात येईल. दुचाकी वाहनांवर हेल्मेट सक्तीचा दंड माफ करण्यात यावा व नागरिकांचे प्रबोधन वर जोर द्यावा, अशी भूमिका बसपाने मांडलेली आहे. बसपाच्या वतीने विभागीय आयुक्त सौरभ राव यांना प्रदेश प्रभारी हुलगेश चलवादी ,प्रदेश महासचिव सुदीपजी गायकवाड ,पुणे जिल्हा प्रभारी रमेश गायकवाड, महमूद जकाते यांनी निवेदन दिले.
