Friday, October 23, 2026
Latest NewsMAHARASHTRATOP NEWS

मविआ सरकार राज ठाकरेंनाही निश्चितच तुरुंगात डांबेल -चंद्रकांत पाटील

मुंबई: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मशिदीसमोरील भोंग्याबाबत ३ मेचा अल्टीमेटम दिला होता. अन्यथा ४ तारखेपासून हनुमान चालीसा वाजवण्याचे आदेश त्यांनी मनसैनिकांना दिले होते.

दरम्यान त्यांच्या अल्टीमेटमची मुदत आज संपली आहे. तर या पार्श्वभूमीवरच भाजप प्रदेशाध्यक्ष व आमदार चंद्रकांत पाटील यांनी थेट मविआ सरकारवर निशाणा साधला आहे.
हनुमान चालिसा वाचणं राजद्रोह ठरवणारं मविआ सरकार खासदार-आमदार दाम्पत्याला तुरुंगात डांबण्यासाठी जंग-जंग पछाडतंय. काहीही करून हिंदुत्वाची मुस्कटदाबी करायचीच, हाच या सरकारचा अजेंडा आहे. या परिस्थितीत कोर्टानं आदेश दिलेले भोंगे काढा म्हणणाऱ्या राज ठाकरेंबाबतही वेगळं काय होणार?” असा सवाल चंद्रकांत पाटील यांनी उपस्थित केला आहे

बेकायदा भोंग्याच्या आवाजानं होणाऱ्या ध्वनिप्रदूषणाला आक्षेप असल्याचं राज ठाकरेंनी स्पष्ट केलंय. हे भोंगे काढण्याचे आदेश न्यायालयानेही दिलेत. प्रसंगी न्यायालयाचा अवमान करू, पण हिंदुत्वाची मुस्कटदाबी करूच, अशी भूमिका मविआ सरकार घेईल आणि राज ठाकरेंनांही निश्चितच तुरुंगात डांबेल.असा टोला चंद्रकांत पाटील यांनी लगावला आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading