बाबा रॉड्रिक्स अँड सन्स आयटीएफ एस200 वरिष्ठ टेनिस अजिंक्यपद स्पर्धेत केतन धुमाळ, सुजय महादेवन, गगनदीप वासू यांची आगेकूच   

पुणे : एमएसएलटीए व पीएमडीटीए यांच्या मान्यतेखाली होत असलेल्या बाबा रॉड्रिक्स अँड सन्स आयटीएफ एस200(गुण) वरिष्ठ टेनिस अजिंक्यपद स्पर्धेत केतन धुमाळ, सुजय महादेवन, गगनदीप वासू या खेळाडूंनी आपापल्या गटातील मानांकित खेळाडूंवर विजय मिळवत आगेकूच केली. 
 
एमएसएलटीए स्कुल ऑफ टेनिस म्हाळुंगे बालेवाडी येथे सुरु असलेल्या या स्पर्धेत 35वर्षांवरील पुरुष गटात उपांत्यपूर्व फेरीत पुण्याच्या केतन धुमाळ याने पाचव्या मानांकित संभाजी चव्हाणचे आव्हान 6-1, 6-1 असे संपुष्टात आणले. बिगरमानांकीत सुजय महादेवन याने दुसऱ्या मानांकित गणेश देवखिळेवर 6-2, 6-0 असा सनसनाटी विजय मिळवला.  45वर्षांवरील पुरुष एकेरीत उपांत्यपूर्व फेरीत अव्वल मानांकित नितीन कीर्तनेने सुजित कुमार टीपीला 6-0, 6-1 असे पराभूत केले.  अकराव्या मानांकित गगनदीप वासूने चौथ्या मानांकित राजीव अरोराचा 6-2, 6-1 असा पराभव करून उपांत्य फेरीत धडक मारली. 65वर्षांवरील गटात पाचव्या मानांकित एकनाथ किणीकरने चौथ्या मानांकित महेंदर कक्कडचा 6-1, 6-2 असा सहज पराभव करून आगेकूच केली.
60वर्षांवरील पुरुष गटात उपांत्य फेरीत अव्वल मानांकित दिपांकर चक्रवर्तीने श्रीकृष्ण कुलकर्णीचा 6-0, 6-1 असा तर, दुसऱ्या सामन्यात दुसऱ्या मानांकित अनिल निगमने शिरीष नांदुर्डीकरचा टायब्रेकमध्ये 7-6(1), 6-0 असा पराभव करून अंतिम फेरीत प्रवेश केला. 

Leave a Reply

%d bloggers like this: