आप महापालिकेची निवडणूक लढविण्यासाठी सज्ज… सर्व जागा लढवणार

पुणे:पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकीचे बिगुल आता वाजले असून विजय कुंभार यांच्या नेतृत्वात आम आदमी पक्ष महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये सर्व जागा लढविण्यासाठी सज्ज झाला आहे. पंजाब विधानसभेतील दणदणीत विजयानंतर आम आदमी पक्षाच्या कार्यकर्त्यांचे मनोबल उंचावले आहे. सर्वसामान्य पुणेकरांकडून विकासाच्या दिल्ली मॉडेलला आणि प्रामाणिक राजकारणाच्या आवाहनाला अतिशय सकारात्मक प्रतिसाद भेटत आहे.

गेल्या काही महिन्यांपासून आम आदमी पक्ष प्रभाग पातळीवर कोपरा सभा, गृहभेटी, तिरंगा यात्रा या माध्यमातून जनसंपर्क वाढवण्याचे काम करत आहे. निवडणूक मेळावे आणि सदस्य नोंदणी अभियानाच्या माध्यमातून संघटन वाढवण्याचे काम करत आहे. पुणे मनपा पातळीवरील सर्वसामान्यांचे जिव्हाळ्याचे अनेक मुद्दे आम आदमी पक्षाने मांडले आहेत. पालिकेतील भ्रष्टाचाराची अनेक प्रकरणे उघडकीस आणली आहेत. जनसामान्यांच्या प्रश्नावर आंदोलने केली आहेत.

येत्या महानगरपालिका निवडणुकीमध्ये विकासाचे दिल्ली मॉडेल सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचवून “संधी द्या, सुविधा घ्या” हा नारा देत लोकांना साद घालण्याचे आम आदमी पक्षाने ठरविले आहे.

Leave a Reply

%d bloggers like this: