वी आणि आयसीआरआयईआरची भागीदारी इन्व्हिक्ट ची स्थापना करणार

नवी दिल्ली :  टेलिकॉम धोरण, प्रशासन आणि नियमन या क्षेत्रात संशोधन सल्ला व धोरण साहाय्य उपलब्ध करवून देण्यासाठी आणि डिजिटल इंडिया मिशन पूर्ण करण्यात योगदान देण्यासाठी वोडाफोन आयडिया लिमिटेडने (वी) इंडियन कौन्सिल फॉर रिसर्च ऑन इंटरनॅशनल इकॉनॉमिक रिलेशन्ससोबत (आयसीआरआयईआर) भागीदारी केली असून त्यामार्फत टेलिकॉम सेंटर ऑफ एक्सेलन्स (सीओई) स्थापन करण्यात आले असून त्याचे नाव इन्व्हिक्ट – आयसीआरआयईआर अँड वोडाफोन आयडिया सेंटर फॉर टेलिकॉम ठेवण्यात आले आहे.     
 
आयसीआरआयईआरचे संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ दीपक मिश्रा व वोडाफोन आयडिया लिमिटेडचे चीफ रेग्युलेटरी व कॉर्पोरेट अफेअर्स ऑफिसर श्री पी बालाजी यांनी यासंदर्भातील समझोता करारावर नुकत्याच दिल्लीमध्ये स्वाक्षऱ्या केल्या.     
 
या सेंटर ऑफ एक्सेलन्समध्ये सरकार, शिक्षण क्षेत्र आणि उद्योगक्षेत्रातील हितधारकांना एकाच मंचावर एकत्र आणून भारताच्या टेलिकॉम क्षेत्रासाठी नव्याने उदयास येत असलेले तंत्रज्ञान व व्यवसाय ट्रेंड्सना प्रतिक्रिया म्हणून समन्वयित धोरणाच्या विकासाचा रस्ता खुला करवून दिला आहे.     
 
जागतिक पातळीवरील एक सर्वात मोठी टेलिकॉम बाजारपेठ असलेले भारतीय टेलिकॉम क्षेत्र डिजिटल भारत वाटचालीचा कणा बनले आहे. भारत ५जी युगामध्ये प्रवेश करत असताना या क्षेत्रातील प्रतिभावंतांमध्ये सुधारणा घडवून आणण्याची, तंत्रज्ञानात नावीन्यपूर्णतेला प्रोत्साहन देईल असे वातावरण निर्माण करण्याची राष्ट्रीय माहिती पायाभूत सोयीसुविधा सुरक्षित ठेवून त्यांचे व्यवस्थापन करण्याची व अधिक कनेक्टिव्हिटीमार्फत आर्थिक सुधारणा घडवून आणण्याची गरज आहे.     
 
सर्वोत्तम प्रथा ओळखून आणि त्यांचा समावेश करून, ज्ञान निर्मिती व ज्ञानाची देवाणघेवाण करून आणि भारतीय टेलिकॉम क्षेत्रावर प्रभाव करणाऱ्या नियमन, धोरण व प्रशासन यांच्या गरजा पूर्ण करून कमतरता भरून काढणे हा इन्व्हिक्टचा उद्देश आहे.     
 
वोडाफोन आयडिया लिमिटेडचे चीफ रेग्युलेटरी व कॉर्पोरेट अफेयर्स ऑफिसर श्री. पी बालाजी यांनी सांगितले, “भारतात डिजिटल क्रांती घडून यावी यासाठी प्रोत्साहन देण्यात टेलिकॉम उद्योग महत्त्वाची भूमिका बजावत आहे. भारतातील डेटावर चालणारा समाज उच्च वेगवान नेटवर्क्स व सर्वव्यापी कनेक्टिव्हिटीवर उभारला जात असताना ५जी सुरु होत असल्याने नव्या संधींचे दरवाजे खुले होतील ज्यामुळे देशात नावीन्यपूर्णतेला चालना मिळेल. धोरण नियोजन करत असताना डिजिटल कनेक्टिव्हिटीला प्राधान्यक्रमामध्ये सर्वात पहिला क्रमांक दिला गेला पाहिजे. आयसीआरआयईआरसोबत भागीदारी करून इन्व्हिक्टची स्थापना करण्यात आल्यामुळे आम्ही संशोधनाला आणि टेलिकॉम धोरण, प्रशासन व नियमन याबाबत सर्व हितधारकांमध्ये संवादाला उत्तेजन देऊ शकू.  या क्षेत्राची सतत व स्थिर वृद्धी होत राहावी आणि सरकारचे डिजिटल इंडिया मिशन पूर्ण होण्यात योगदान दिले जावे हा आमचा यामागचा दृष्टिकोन आहे.”         
 
आयसीआरआयईआरचे संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. दीपक मिश्रा यांनी सांगितले, “आयसीआरआयईआर आणि वोडाफोन आयडिया सेंटर फॉर टेलिकॉम (इन्व्हिक्ट) भारतात टेलिकॉम धोरण संशोधनातील आधारभूत विश्लेषणे मजबूत करण्याबद्दलची आयसीआरआयईआरची दीर्घकालीन वचनबद्धता दर्शवते. हे सेंटर आयसीआरआयईआरच्या प्रभावी संशोधन क्षमता आणि वोडाफोन आयडियाचा विशाल सार्वजनिक धोरण विस्तार दर्शवते. म्हणूनच आमची अपेक्षा आहे की हे सेंटर टेलिकॉम क्षेत्रामध्ये ज्ञान, धोरण संकल्पना व तांत्रिक साहाय्य यांचा विश्वसनीय स्रोत बनावे.”     
 
इन्व्हिक्ट हे स्वायत्त संशोधन केंद्र म्हणून काम करेल. याठिकाणी खाजगी क्षेत्र, शिक्षण क्षेत्र व सरकारमधील हितधारकांना एकत्र आणले जाईल, त्यांच्यातील समन्वय व त्यांची बलस्थाने यांच्या आधारे देशातील सर्वोत्तम प्रतिभावंतांसोबत काम केले जाईल. याठिकाणी प्रमुख संशोधनाचा भर टेलिकॉम आणि आयसीटीसह संबंधित क्षेत्रांशी संबंधित धोरणातील व्यापक विषय, नियमन व सराव यावर असेल. नियमित कार्यशाळा आणि गोलमेज बैठकांमधून माहिती, अंतःदृष्टी यांची उद्योगक्षेत्र, सरकार, नियामक अधिकारी आणि इतर शैक्षणिक संस्थांसोबत देवाणघेवाण करण्यासाठी हा एक प्रभावी मंच ठरेल.     
संशोधनाला प्रोत्साहन देण्यासाठी इन्व्हिक्ट सरकारमान्य इन्क्युबेटर्ससोबत देखील हातमिळवणी करेल.  नवी दिल्लीमध्ये हे सेंटर असून त्याचे प्रशासन व व्यवस्थापन आयसीआरआयईआर व वोडाफोन आयडिया लिमिटेड यांच्या लीडरशिप नॉमिनीजच्या संयुक्त अध्यक्षतेखाली असलेल्या एका मंडळामार्फत केले जाईल.  या मंडळामध्ये टेलिकॉम विभाग, टीआरएआय आणि सीओएआयच्या वरिष्ठ प्रतिनिधींचा समावेश असेल.

Leave a Reply

%d bloggers like this: