महापालिका अतिरिक्त आयुक्तपदी विलास कानडे यांची नियुक्ती
पुणे : महापालिकेच्या रिक्त झालेल्या अतिरिक्त आयुक्तपदी मिळकतकर विभागाचे प्रमुख विलास कानडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या पदावरून नुकतेच ज्ञानेश्वर मोळक सेवा निवृत झाले होते.
त्यानंतर 30 एप्रील रोजी मोळक सेवा निवृत्त झाल्याने शासनाने रिक्त झालेल्या या पदावर कानडे यांची नियुक्ती केली असून सप्टेंबर 2022 अखेर कानडे सेवा निवृत्त होत असल्याने पाच महिन्यांसाठी त्यांची ही नियुक्ती असणार आहे. कानडे हे शांत, संयमी आणि मितभाषी अधिकारी ते महापालिकेत परिचित असून त्यांच्याकडे महापालिकेच्या मिळकतकर विभागाचा पदभार होता.त्यांच्या कारकिर्दीत महापालिकेच्या मिळकतकर विभागाने महापालिकेच्या इतिहासात सर्वाधिक मिळकतकर वसूलीचा विक्रम केलेला आहे. विशेष म्हणजे करोना संकटात सर्वाधिक मिळकतकर वसूली करणारी पुणे ही राज्यातील पहिल्या क्रमांकाची महापालिका ठरली होती.