सोनालिका ट्रॅक्टर्सने एप्रिलमध्ये १२ ,३२८ ट्रॅक्टरची विक्री करत नोंदवली विक्रमी नोंद

पुणे : देशातील ट्रॅक्टर निर्यात क्षेत्रातील नंबरवन ब्रँड सोनालिका ट्रॅक्टरने एप्रिल महिन्यात १२ ,३२८ ट्रॅक्टरची विक्री करून एक नवा विक्रम नोंदवला आहे. २०२१- २२ या आर्थिक वर्षात ट्रॅक्टरची विक्री आणि उत्पादन या दोन्हींमध्ये सोनालिकाने दमदार कामगिरी केली आहे.गेल्या वर्षीच्या आर्थिक कामगिरीसह सोनालीका आता २०२३ मध्ये बाजारात मोठे यश संपादन करण्यासाठी सज्ज झाली आहे.सोनालिकाने आत्तापर्यंत एप्रिलमध्ये सर्वाधिक १०,२१७ ट्रॅक्टरची विक्री केली होती. गेल्या वर्षी कंपनीने ७,१२२ देशांतर्गत ट्रॅक्टरची विक्री केली होती. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा विक्री ४३.५ टक्क्यांनी वाढली आहे. तर कंपनीने एकूण ४१ टक्के उद्योग वाढ नोंदवली आहे. या सर्व एकूण कामगिरीतून पुढील वर्षात पुन्हा असाधारण यश मिळविण्यासाठी कंपनी सज्ज झाली आहे.

भारतातील अग्रगण्य ट्रॅक्टर उत्पादनांपैकी एक असलेल्या सोनालिका ट्रॅक्टर गरजेनुसार ट्रॅक्टर तयार करण्यात अनोख्या पद्धतीचा वापर करते. त्याद्वारे शेतकऱ्यांच्या शेती असो किंवा मालवाहतूक या सर्व बाबींमधील गरजा पूर्ण करणे शक्य होते. तसेच जगभरातील शेतीची समृद्धी व्हावी या दृष्टीने कामकाज करून कंपनीने गेल्या दोन वर्षांत निर्यात दुप्पट केली आहे. या निर्यातीतून कंपनीने सर्व क्षेत्रामध्ये विश्वास निर्माण केला आहे. कंपनीच्या हेवी ड्यूटी रेंजला मोठा प्रतिसाद मिळत आहे. गेल्या अर्ध्या दशकापासून कंपनी दरवर्षी १ लाख ट्रॅक्टर विक्री करत आहे. आर्थिक वर्ष २०२३ च्या सुरवातीलाच सोनालिका वर्षभरात नवीन उत्पादनांच्या लाँचसाठी आणि जगभरातील ग्राहकांना उत्कृष्ट सेवा पुरविण्यास पूर्णपणे तयार आहे.

सोनालिका ट्रॅक्टर्सचे सहव्यवस्थापकीय संचालक रमण मित्तल म्हणाले की आर्थिक वर्ष २०२३ च्या पहिल्या तिमाहीची सुरवात आमच्यासाठी सर्वात उत्साहवर्धक आहे. आमच्या तांत्रिकदृष्ट्या प्रगत आणि गरजेनुसार बनवून मिळणाऱ्या ट्रॅक्टर्सवरील नागरिकांचा विश्वास वाढत आहे. त्यामुळे मी आमच्या ग्राहकांचा आणि आमचे चॅनल भागीदार जे आमच्यासोबत जगभरातील सर्वोत्कृष्ट ट्रॅक्टरचे चांगले वितरण करण्यासाठी वचनबद्ध आहेत . केवळ दोन वर्षांत आमची निर्यात दुप्पट झाली आहे. संपूर्ण आर्थिक वर्ष २०२२ मध्ये विविध आव्हानांवर मात करीत मजबूत गती टिकवली आहे.  २०२३ साठी ची तयारी करताना आम्ही आमच्या उत्पादन धोरणाचे अनुसरण करणे सुरू ठेवू. ज्यामध्ये नावीन्यपूर्ण ट्रॅक्टर तसेच प्रगत तंत्रज्ञान अपग्रेड करणे समाविष्ट आहे.

Leave a Reply

%d bloggers like this: