महापालिकेच्या कर्मचाऱ्यांना गणवेश परिधान करण्याचे अतिरिक्त आयुक्त रवींद्र बिनवडे यांचे आदेश

पुणे : महापालिकेच्या गणवेशाऐवजी जीन्स टी-शर्ट आणि फॉर्मल कपडे परिधान करणाऱ्या कर्मचाऱ्यांना गणवेश परिधान करण्याचे आदेश अतिरिक्त आयुक्त रवींद्र बिनवडे यांनी दिले आहेत आणि त्यावर नजर ठेवण्याची जबाबदारी खातेप्रमुखांना दिली आहे.

पालिकेमध्ये सध्या आयुक्त कार्यालयातील शिपाई सोडले तर इतर कार्यालये आणि क्षेत्रीय कार्यालयांतील शिपाई गणवेश घालत नाहीत. बांधकाम, घनकचरा, अग्निशमन यांसह इतर विभागांतील सेवक व शिपाई संवर्गातील कर्मचाऱ्यांना गणवेश बंधनकारक आहे. त्यासाठी त्यांच्या बॅंक खात्यात थेट पैसे जमा केले जातात. सेवक हे रंग-बेरंगी शर्ट, टी-शर्ट, जीन्स ,स्पोर्ट्स बूट अशा गणवेशात वावरतात, त्यामुळे नागरिकांना कार्यालयाबाहेर सेवक कोण आहेत, हे कळत नाही. मात्र, आता अतिरिक्त आयुक्त रवींद्र बिनवडे यांनी या संदर्भात आदेश काढून गणवेश घालणे बंधनकारक केले आहे. कामगार अधिकारी नितीन केंजळे यांनी महापालिकेत कर्मचारी गणवेश घातला आहे की नाही, याची तपासणी करावी.असे बिनवडे यांनी आदेशात नमूद केले आहे.

Leave a Reply

%d bloggers like this: