भोंग्यावर हनुमान चालीसा वाजवणे ऊत्तर नव्हे – काँग्रेस राज्य प्रवक्ता गोपाळदादा तिवारी

पुणे : वाढती महागाई, बेरोजगारी इ मुलभूत प्रश्नावरील जनतेचे लक्ष विचलीत होण्यासाठीच् मशीदीवरील भोंगे, श्री हनुमान चालीसा, बाबरी मशीद वाद, ईतिहासाची तोडमोड इ धार्मिक व जातीय तेढ वाढवणारे मुद्दे नाहक ऊपस्थित करण्याचे प्रयत्न केंद्रातील सत्ताधारी भाजप मनसेला पुढे करत करीत असुन, जनतेने या कुटील प्रयत्नांना बळी पडू नये असे आवाहन काँग्रेस राज्य प्रवक्ते गोपाळदादा तिवारी यांनी देशभरात साजऱ्या होणाऱ्या ‘रमझान ईद व अक्षय तृतीया’च्या पुर्वसंध्येस केले.

राज ठाकरे यांनी राज्यात “स्पीकर व भोंग्याचा” प्रश्नांवर संबंधीत पोलीस ठाण्यात तक्रारी करणे विषयी बोलावे, त्यांनी कारवाई न केल्यास संबंधीत पोलीस स्टेशन बाहेर आंदोलन करावे.. मात्र त्यास प्रत्युत्तर म्हणून भोंग्यांवर श्री हनुमान चालीसा वाजवणे हे कशाचे द्योतक (?) असा ऊलट सवाल केला. गणेशोत्सव, दहीहंडी काळात अनेक नागरीक स्पीकर चा आवाज वाढल्यास (फोन वर देखील) तक्रारी करतात. त्यावेळी कारवाई करायला तत्परतेने पोलीस येतात, गणेश विसर्जन मिरवणूका देखील थांबतात. तर मग मशीदी वरील भोंग्याना देखील तेच ‘वेळेचे व मर्यादीत डेसिबल’चे बंधन आहे, हे देखील मनसे नेत्यांना कळू नये का? अन्यथा मनसे नेत्यांनी कायद्याची कलमे जाणून घ्यावीत, असा सल्ला देखील गोपाळदादा तिवारी यांनी दिला!

‘रमझान ईद व अक्षय तृतीया’ प्रसंगी नाहक ‘सामाजीक तेढ’ पसरवण्याचे कुटील प्रयत्न करू नयेत, अन्यथा राज्यात कायदा सुव्यवस्था पाळण्यास मविआ सरकार सक्षम व समर्थ आहे याची जाणीव ठेवावी असे ही काँग्रेस प्रवक्ते गोपाळदादा तिवारी यांनी सांगितले.

Leave a Reply

%d bloggers like this: