शासनाच्या योजनांची तंतोतंत माहिती मिळाली – महिला कर्मचाऱ्यांची प्रतिक्रिया

पुणे : ‘शासनाच्या वेगवेगळ्या योजनांची तंतोतंत माहिती एकाच ठिकाणी पहायला मिळाली. प्रदर्शनाची कल्पना खूप सुंदर!’ अशी प्रतिक्रिया माहिती व जनसंपर्क महासंचालनालय अंतर्गत विभागीय माहिती कार्यालयामार्फत आयोजित प्रदर्शन पहायला आलेल्या महिला स्वच्छता कर्मचारी योगिता पंडित यांनी व्यक्त केली.

जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित प्रदर्शनामुळे महिला व बालविकास, कामगारांच्या  योजना, शेतीविषयक माहिती, आदिवासींच्या अशा विविध  योजनांची माहिती मिळाली. हे प्रदर्शन खूपच माहितीपूर्ण असून उपयोगी आहे. आमच्या १२-१३ सहकाऱ्यांनी प्रदर्शनाला भेट दिली. प्रदर्शनात साध्या व सोप्या पद्धतीने माहिती दिली आहे. आम्हाला उपयुक्त पडतील अशा यापूर्वी माहित नसलेल्या योजनांची माहिती मिळाल्याने त्यांचा लाभ घेण्यासाठी निश्चित प्रयत्न करू, असेही श्रीमती पंडित म्हणाल्या.

Leave a Reply

%d bloggers like this: