चित्रा वाघ उद्या पुण्याच्या शिवाजीनगर पोलिसांत नोंदवणार जबाब

पुणे : शिवसेना नेते रघुनाथ कुचिकप्रकरणी भाजपा नेत्या चित्रा वाघ उद्या शिवाजीनगर पोलीस स्टेशनला जाणार आहेत. कुचिक प्रकरणात चित्रा वाघ यांचा उद्या जबाब नोंदवला जाणार आहे.

लैंगिक अत्याचाराच्या प्रकरणात रघुनाथ कुचिक यांचा जामीन रद्द करण्याची मागणी वाघ यांनी केली होती. याचप्रकरणी त्या उद्या सकाळी 11 वाजता जबाब नोंदविणार आहेत. आपल्या ट्विटमध्ये त्यांनी रघुनाथ कुचिक यांचा बलात्कारी तसेच एकेरी उल्लेख केला आहे. त्या म्हणाल्यात, ‘रघुनाथ कुचिक जामिनावर बाहेर असून जामिनाच्या अटीशर्तींचा त्याने भंग केल्याने चौकशी होत आहे. रघुनाथ कुचिकचा जामीन रद्द व्हावा, ही मागणी’. लैंगिक शोषणप्रकरणी एका तरुणीने रघुनाथ कुचिक यांची तक्रार केली होती, त्यानुसार गुन्हा दाखल झाला होता. तर सध्या कुचिक जामिनावर आहेत. मात्र त्यांचा जामीन रद्द करण्याची मागणी चित्रा वाघ यांनी केली आहे.

Leave a Reply

%d bloggers like this: