पर्वती मतदार संघाच्या रेशनिंग कमिटीची मीटिंग तातडीने घ्या-अश्विनी कदम

पुणे : दर महिन्याच्या १५ ते १८ तारखे पर्यंत सर्व दुकानामध्ये अन्न-धान्य उपलब्ध होते व ते ३० तारखे पर्यंत वाटप करणे अपेक्षित होते ,परंतु २९ तारीख आली तरी अजून रेशन दुकानांमध्ये अन्न-धान्य आलेले नाही.FDO यांची बदली झाल्यामुळे त्यांच्या जागी सक्षम अधिकारी अजून नेमलेले नाही म्हणून पुरवठा विभागाच्या जिल्हाधिकारी सुरेखा माने यांची यांची भेट घेतली व तातडीने त्यांना सर्व दुकानामध्ये अन्न-धान्य पुरवठा करावे अशी मागणी माजी नगरसेविका अश्विनी कदम यांनी पुणे महानगरपालिकेच्या अन्नधान्य पुरवठा विभाग अधिकारी यांच्याकडे निवेदन देऊन केली आहे.

अश्विनी कदम म्हणाल्या,शासनाने रेशनिंग समिती स्थापन केली व त्यावर माझी नेमणूक झाली आहे ,तरी अद्याप रेशनिंग कमिटीची बैठक अथवा सभा झाल्या नाहीत. यामुळे नागरिकांच्या अनेक अडचणी समोर आलेल्या दिसतात.कुटुंबातील पूर्ण सदस्यांचे धान्य न मिळणे,Thumb register न होणे, प्राधान्य गटाचे विवीध प्रश्न अशा अनेक अडचणींना सामोरे जावे लागते.
सबब रेशन दुकानातील नागरिकांच्या समस्यांच्या संदर्भात लवकरात लवकर निराकारण होण्यासाठी रेशनिंग समितीची मीटिंग किंवा सभेचे नियोजन तातडीने करण्यात यावे. अशी मागणी अश्विनी कदम यांनी केली आहे.

Leave a Reply

%d bloggers like this: