Tuesday, June 16, 2026
Latest NewsPUNE

‘जयंती जल्लोष ‘ कार्यक्रमाला उदंड प्रतिसाद

पुणे : नीलक्रांती विचारमंच, भीम योध्दा ग्रुप यांच्या वतीने महामानवांच्या जयंतीनिमित्त आयोजित ‘जयंती जल्लोष २०२२’ या कार्यक्रमाला चांगला प्रतिसाद मिळाला. नुकताच एसबीआय चौक,गोकुळ नगर ( कात्रज- कोंढवा रस्ता ), येथे हा कार्यक्रम उत्साहात पार पडला. यावेळी राकेश कांबळे, लोकजनशक्ती पार्टी (रामविलास ) या पक्षाचे पुणे शहर -जिल्हा अध्यक्ष संजय आल्हाट , आदिनाथ भाकरे यांनी पुढाकार घेतला .काँग्रेसचे शहराध्यक्ष रमेश बागवे,राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप आदी उपस्थितीत होते. 

छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर या महामानवांची जयंती संयुक्तपणे साजरी करण्यासाठी हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता .

अमर पुणेकर,’ ओ शेठ, तुम्ही नादच केलाय थेट ‘ या गीताचे गायक उमेश गवळी, रोमिओ कांबळे तसेच राखी चौरे इत्यादी गायक सहभागी सहभागी झाले.गीते आणि पोवाड्यानी आसमंत दणाणून टाकला.प्रा.सुभाष वारे यांचे ‘संविधान :काळाची गरज’ हे पुस्तक उपस्थितांना भेट देण्यात आले.राहुल उभे,शरद टेमगिरे,सतीश मासाळकर,संतोष शिंदे,श्याम पासी,राजेश पिवाल,बाबा कदम,संजय चव्हाण,निखिल मुनोत आदी मान्यवर उपस्थित होते.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading