महागाई व भोंग्या विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे भोंगा वाजवुन आंदोलन

पुणे: पाच राज्यातील विधानसभेच्या निवडणुका पार पडल्या तरी महागाई अजून काही केंद्र सरकारने कमी केले नाही त्यामुळे विरोधी पक्ष महागाईविरुद्ध आक्रमक झाले आहेत. काँग्रेसने सुद्धा चार-पाच दिवसापूर्वी महागाई विरुद्ध आंदोलन केले होते आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने महागाई व भोग्या विरुद्ध पुण्यात गुडलक चौकात भोंगा वाजवुन आंदोलन केले.
या आंदोलनाचे नेतृत्व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पुणे शहर अध्यक्ष प्रशांत जगताप यांनी केले. या आंदोलनाच्या वेळी मोदी सरकारने वाढल्याने महागाईचा निषेध व्यक्त करण्यात आला.
या आंदोलनाला राष्ट्रवादी काँग्रेसच्या युवती अध्यक्ष सीमा सातपुते, मृणाल वाणी, प्राजक्ता जोशी, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पुणे शहर प्रवक्ते प्रदीप देशमुख राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पुणे शहरातील पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
प्रशांत जगताप म्हणाले, या मोदी सरकारने एवढी महागाई वाढवली असून आज आम्हाला
भोंगे वाजवून आंदोलन करण्याची वेळ आली आहे. महागाई  ही कमी होत नसली तरी राज्यात मशिदीवरील भोंगयांचा विषय वाजत आहे . विरोधी पक्षांनी पण महागाई विरुद्ध आवाज उठवला पाहिजे म्हणून आज आम्ही भोंगे वाजवुन या मोदी सरकारचा निषेध करत आहोत . असे प्रशांत जगताप म्हणाले.

Leave a Reply

%d bloggers like this: