महाराष्ट्राने पेट्रोल-डिझेलवर कर कमी न केल्याने नागरिकांवर बोजा वाढला – पंतप्रधान

नवी दिल्‍ली : पेट्रोल आणि डिझेलच्या किमतींचा भार कमी करण्यासाठी केंद्र सरकारने उत्पादन शुल्क कमी केले, परंतु अनेक महाराष्ट्र राज्य सरकारने कर कमी केले नाहीत. त्यामुळे नागरिकांवर बोजा वाढला आहे, असे वक्तव्य पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज केले. 

कोविड-19 परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज येथे मुख्यमंत्र्यांशी संवाद साधला. यावेळी पंतप्रधान बोलत होते. केंद्रीय आरोग्य सचिवांनी यावेळी एक सादरीकरण केले. यात जगातील अनेक देशांमध्ये वाढत असलेल्या रुग्णसंख्येबद्दल त्यांनी चर्चा केली, तसेच भारतातील काही राज्यांमधील रुग्णसंख्येच्या वाढीवर प्रकाश टाकला. राज्यांनी नियमितपणे माहितीवर लक्ष ठेवणे आणि अहवाल देणे, प्रभावी देखरेख , पायाभूत सुविधा अद्ययावत करणे आणि केंद्राने दिलेला निधी वापरणे या आवश्यकतेबद्दल त्यांनी सांगितले.

पंतप्रधानांचा जीवन आणि उपजीविकेचा मंत्र राज्य पाळत आहे असे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री म्हणाले. एनसीआरमधील शहरांमध्ये मोठ्या प्रमाणात रुग्ण आढळत असल्याचे त्यांनी नमूद केले.

दिल्लीचे मुख्यमंत्री म्हणाले की, अलीकडच्या काही दिवसांत दिल्लीमध्ये रुग्णवाढीचा दर अधिक दिसून आला आहे. मुखपट्टी पुन्हा अनिवार्य करायला हवी असेही त्यांनी सांगितले. मिझोरमचे मुख्यमंत्री म्हणाले की, पंतप्रधानांच्या भक्कम पाठिंब्याने आणि मार्गदर्शनामुळे राज्याला आधीच्या कोरोना लाटांवर मात करण्यास मदत झाली आहे. आरोग्याच्या इतर बाबी आणि विकासाच्या मुद्द्यांवरही त्यांनी केंद्र सरकारच्या पाठिंब्याबद्दल आभार मानले.

कर्नाटकचे मुख्यमंत्री म्हणाले की, पंतप्रधानांनी दिलेले मार्गदर्शन हे नंतरच्या कोविड लाटांना अधिक चांगल्या प्रकारे सामोरे जाण्यास मदत करणारे आहे. त्यांनी कोविड प्रतिबंधक वर्तन सुनिश्चित करण्यासाठी चालवल्या जात असलेल्या जनजागृती मोहिमांचा उल्लेख केला.

हरियाणाचे मुख्यमंत्री म्हणाले की, राज्यात मुख्यतः दिल्लीच्या आसपास, गुरुग्राम आणि फरीदाबाद या शहरांमध्ये मोठ्या प्रमाणात रुग्ण आढळत आहेत.

आपल्या भाषणाच्या समारोपाआधी तमिळनाडूतील तंजावर येथे रस्ते अपघातात झालेल्या जीवितहानीबद्दल शोक व्यक्त करून मोदी यांनी या दुर्घटनेतील पीडितांसाठी पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधी (पीएमएनआरएफ) मधून मदत जाहीर केली.

 

 

 

Leave a Reply

%d bloggers like this: