Sunday, November 8, 2026
Latest NewsPUNE

आरोग्य विभाग गट क पदभरती; विद्यार्थ्यांचे आमरण उपोषण.

पुणे: २०१९ साली आरोग्य विभागाने गट क वर्गातील ५२ पदांसाठी एकूण 2725 रिक्त जागा भरती प्रक्रिया सुरू केली परंतु २०१९ ला परीक्षा झालीच नाही. पुढे याच भरतीसाठी 24 ऑक्टोबर २०२१ ला परीक्षा पार पडली यादरम्यान आरोग्य विभागाच्या गट क परीक्षेतील पेपर फुटीचा प्रकार उघडकीस आला आणि त्याचा निकाल 24 नोव्हेंबर २०२१ ला जाहीर झाला आहे. परंतु गट क वर्गातील पोलिस अहवालानुसार ज्या पदांचा पेपर फुटला आहे ती पदे सोडून बाकीच्या पदांची निवड यादी जाहीर करावी आणि गट क वर्गातील सर्व पदांची निवड प्रक्रिया सरसकट रद्द करु नये या मागणीसाठी उमेदवारांनी आंदोलन सुरू केले आहे. मोठ्या संख्येने विद्यार्थी या आंदोलनात उपस्थित झालेले आहेत. या वेळी आंदोलनाच्या वेळी उमेदवारांनी आरोग्य विभागातील गट क पदभरतीची निवड यादी जाहीर व्हावी अशी मागणी केली.

Leave a Reply