fbpx
Monday, June 17, 2024
Latest NewsPUNE

23 गावातील पाणीपुरवठयाचे वेळापत्रक निश्चित करून पालिकेच्या वेबसाईट, संबंधित क्षेत्रीय कार्यालयात लावा – दिलीप वेडे पाटील

पुणे: आमच्या परिसरामध्ये आणि महानगरपालिकेच्या हद्दीत नव्याने समाविष्ट झालेल्या तेवीस गावांच्या मध्ये पाणीपुरवठा कुणी करायचा या वरून वाद असल्याचे माझ्या लक्षात आले. या गावांचा प्रारूप विकास आराखडा पीएमआरडीए करीत आहे. तर बाकी सुखसुविधा महानगरपालिका देत आहे त्यावरून दोन्ही संस्थांच्या मध्ये सुप्त संघर्ष आहे असे मला वाटले.

माझ्या नागरिकांच्या होणाऱ्या पाणीपुरवठ्याच्या अनियमित पुरवठा बद्दल अक्षय होता पीएमआरडीए का पुणे महानगरपालिका यांच्यात हा विषय सुटत नव्हता मी राज्य सरकारकडे देखील यात हस्तक्षेप करण्याची मागणी केली होती दुर्दैवाने राज्य सरकारने देखील याकडे दुर्लक्ष केले त्यामुळे नाईलाजाने मला मेहरबान हायकोर्टामध्ये याचिका दाखल करायला लागली त्या याचिकेची सुनावणी 4 मे रोजी आहे. त्यासंदर्भात मेहरबान हायकोर्टाने दिलेली ऑर्डर सोबत जोडीत आहे. त्यात प्रामुख्याने पुणे महानगरपालिकेने या 23 गावांमध्ये पाणीपुरवठा केला पाहिजे महाराष्ट्र जल प्राधिकरण यांना पार्टी करून घ्या ही परवानगी दिली. आणि महाधिवक्ता महाराष्ट्र राज्य यांनी स्वतः कोर्टामध्ये हजर राहून शासनाची बाजू मांडा असे आदेश दिले. म्हणून माझी आपणाकडे मागणी आहे की या तेवीस गावांच्या मध्ये टँकरने पाणीपुरवठा करण्याचे वेळापत्रक निश्चित करून त्याप्रमाणे ते महानगरपालिकेच्या वेबसाईटवर तसेच संबंधित क्षेत्रीय कार्यालयाच्या नोटीस बोर्डावर लावावेत. असे आवाहन माजी नगरसेवक दिलीप वेडे पाटील पुण्यातील पत्रकार परिषदेत केले.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading