ठाकरे कुटुंबीयांनी घेतली फायर आजी चंद्रभागा शिंदेंची भेट

मुंबई- एकीकडे लता मंगेशकर पुरस्कार स्वीकारण्यासाठी पीएम मोदी मुंबईत आले असताना ,पुस्काराचा हा सोहळा मोठा गाजत असताना तिकडे अनुपस्थित राहत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रविवारी सायंकाळी चंद्रभागा शिंदे या 80 वर्षीय शिवसैनिक आजीची सहकुटूंब भेट घेतली. या आजींनी शनिवारी राणा दाम्पत्याविरोधात ‘मातोश्री’बाहेर तळपत्या उन्हात आंदोलन केले होते. त्यात त्यांनी पुष्पा या सुप्रसिद्ध चित्रपटातील ‘मै झुकेगा नही साला’ हा डायलॉग मारुन सर्वांचे लक्ष्य वेधून घेतले होते.

कालपासून एक आजी चांगल्याच चर्चेत आल्या आहेत. झुकेंगे नहीं म्हणत शिवसेनेच्या रणरागिणी ‘फायर’ आज्जींचा रुद्र अवतार गेले दोन दिवस महाराष्ट्राने मातोश्रीबाहेर पाहिला आहे. यानंतर आज आजीच्या भेटीला शिवसेना पक्ष प्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे दाखल झाले आहेत.

आजीने मातोश्री बाहेर येत पुष्पा स्टाईलने खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणांना जोरदार इशारा दिला. त्या 80 वर्षांच्या चंद्रभागा शिंदे आज्जी यांच्या घरी ठाकरे कुटुंबियांनी भेट दिली आहे. यावेळी सामनाच्या संपादक रश्मी ठाकरे, युवासेनाप्रमुख आणि राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी त्यांची सदिच्छा भेट घेतली आहे. मुंबईत शिवसैनिकांनी राणा दाम्पत्याच्या घरासमोर आंदोलन केले, यावेळी या आजी उपस्थित होत्या

Leave a Reply

%d bloggers like this: