आयुष्याला सकारात्मक करणारा ‘तिरसाट’

प्रेमात न पडणाऱ्या लोकांना देखील प्रेमात पडायला लावणारा चित्रपट “तिरसाट”

नीरज सूर्यकांत आणि तेजस्विनी शिर्के ही फ्रेश जोडी प्रेक्षकांच्या भेटीला

“तिरसाट” २० मे पासून संपूर्ण महाराष्ट्रात

“अँटमगिरी” या चित्रपटाच्या यशानंतर दिग्दर्शक प्रदीप टोणगे आणि मंगेश शेंडगे आता “तिरसाट” हा चित्रपट घेऊन येत आहेत. आयुष्याकडे सकारात्मकतेनं पाहण्याचा विचार या चित्रपटातून मांडण्यात आला असून येत्या २० मे ला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नुकतंच या चित्रपटाचं पोस्टर सोशल मीडियाद्वारे लाँच करण्यात आलं.

दिनेश किरवे यांच्या क्लास वन फिल्म्सनं “तिरसाट” या चित्रपटाची निर्मिती केली आहे. अँड. उमेश शेडगे हे सहनिर्माते आहेत. निर्माता दिनेश किरवे यांनीच चित्रपटाचं लेखन केलं आहे. पी.शंकरन यांनी चित्रपटाचं संगीत दिग्दर्शन केलं असून चित्रपटाचे संकलन मंगेश जोंधळे यांनी केल आहे. नकार सकारात्मकतेनं पचवला की आयुष्याला अर्थ येतो या आशयसूत्रावर हा चित्रपट बेतला आहे.

चित्रपटाच्या पोस्टरवरून ही एक प्रेमकहाणी असल्याचं कळतं. नीरज सूर्यकांत आणि तेजस्विनी शिर्के ही नवी जोडी या चित्रपटातून पदार्पण करत आहे. रिफ्रेशिंग अशा या पोस्टरमुळे चित्रपटाची उत्सुकता वाढली आहे.

Leave a Reply

%d bloggers like this: