रॉयल कॅनॉट बोट क्लबच्या अध्यक्षपदी अरुण कुदळे यांची निवड

पुणेः- रॉयल कॅनॉट बोट क्लब या पुण्यातील सगळ्यात जुन्या सोशल क्लबचे 26 वे अध्यक्ष म्हणून ज्येष्ठ उद्योजक अरूण कुदळे यांची निवड करण्यात आली आहे. क्लबच्या उपाध्यक्षपदी डॉ. विश्वास येवले, मानद सचिवपदी मच्छिंद्र देवकर आणि खजिनदारपदी सचिन अभ्यंकर यांची निवड करण्यात आली आहे. ही निवड पुढील दोन वर्षांसाठी करण्यात आली असून आपल्या कारकिर्दीत अनेक नवीन उपक्रम राबवून क्लब एका वेगळ्या उंचीवर नेण्याचा अरूण कुदळे यांचा मानस आहे. त्यासाठी बोट क्लबतर्फे लवकरच मासिक वार्तापत्र, “अप्रिसिएशन ऑफ सिनेमा” हा इंग्लिश सिनेमासाठीचा उपक्रम तसेच विद्यार्थ्यांसाठी तिरंदाजी, व्यक्तिमत्व विकास आणि छायाचित्र प्रशिक्षण वर्ग सुरू करण्यात येणार आहेत.  शिक्षणाने इंजिनिअर असलेले उद्योजक अरूण कुदळे पुण्यातील विविध औद्योगिक आणि सामाजिक संस्थांचे पदाधिकारी म्हणून कार्यरत आहेत.

Leave a Reply

%d bloggers like this: