Tuesday, August 11, 2026
Latest NewsPUNE

उत्तर कोल्हापूर मतदार संघ निवडणुकीतील जयश्री जाधव यांच्या विजयानिमित्त पुण्यात महाविकास आघाडीतर्फे आनंदोत्सव

पुणे : उत्तर कोल्हापूर मतदार संघाच्या महाविकास आघाडीच्या उमेदवार जयश्री जाधव या १८००० अधिक मताने पोट निवडणुकीत निवडून आल्या. या विजयाचा आनंदोत्सव आज पुण्यातील काँग्रेस भवन येथे महाविकास आघाडीच्या सर्व नेत्यांनी साजरा केला. यावेळे घोषणा देवून फटाके वाजवून, लाडू वाटून पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी आपला जल्लोष केला. पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष रमेश बागवे, शिवसेनेचे शहर प्रमुख संजय मोरे, ॲड. अभय छाजेड, गजानन तरकुडे, अरविंद शिंदे, आबा बागुल, वीरेंद्र किराड, लता राजगुरू, सोनाली मारणे, संजय बालगुडे, बाळासाहेब मालुसरे

यावेळी शहराध्यक्ष रमेश बागवे म्हणाले की, ‘‘दिवंगत काँग्रेसचे आमदार चंद्रकांत जाधव यांच्या पत्नी महाविकास आघाडीच्या उमेदवार होत्या. महाविकास आघाडीचे सर्व नेते व कार्यकर्त्यांनी मेहनत करून कोल्हापूरची जागा राखली. भारतीय जनता पक्षाचे प्रदेश अध्यक्ष चंद्रकांत पाटील हे कोल्हापूरमध्ये तळ ठोकून बसले होते. कोल्हापूरच्या पोट निवडणुकीत भारतीय जनता पक्षाचे उमेदवार नक्की निवडून येणार अन्यथा मी राजकीय सन्यास घेईल असे म्हटले होते परंतु कोल्हापूरकरांनी त्यांना नाकारले आणि महाविकास आघाडीच्या उमेदवाराच्या बाजूने कौल दिला. काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षा सोनियाजी गांधी, राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार व मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या खंबीर नेतृत्वामुळे महाविकास आघाडीच्या उमेदवाराला यश मिळाले. कोल्हापूरचे पालक मंत्री सतेज पाटील यांचा या विजयात सिंहाचा वाटा होता.

शिवसेनेचे शहर प्रमुख संजय मोरे म्हणाले की, ‘‘उत्तर कोल्हापूरची निवडणुक ही २०२४ च्या विधानसभा निवडणुकीची नांदी होती. भारतीय जनता पक्षाच्या सर्व नेत्यांनी खोटे आरोप करून कोल्हापूरकरांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला परंतु ते अशयस्वी ठरले.”

यावेळी भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना हिमालयात सन्यास घेण्यासाठी जाण्याकरीता निधी गोळा करण्यात आला. यावेळी शेखर कपोते, राजेंद्र शिरसाट, महिला अध्यक्षा पुजा आनंद, मुख्तार शेख, मेहबुब नदाफ, विठ्ठल गायकवाड, राजेंद्र भुतडा, सचिन आडेकर, प्रविण करपे, द. स पोळेकर, अविनाश अडसुळ, अनुसया गायकवाड, नलिनी दोरगे, शारदा वीर, संतोष डोके, ॲड. नंदलाल धिवार, मुन्नाभाई शेख, हनुमंत पवार, शिलार रतनगिरी, दिपक ओव्‍हाळ, किशोर मारणे, राजू मगर, जावेद निलगर, प्रशांत टेके, विशाल गुंड, आदी प्रमुख नेत्यांसह महाविकास आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading