देवेंद्र फडणवीस यांच्या १४ ट्विट नंतर, हिंदू महासभेचे भाजपला 4 सवाल

पुणे : विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांना उद्देशून १४ ट्विट केले होते. आता हिंदू महासभेने देवेंद्र फडणवीस यांना १७ प्रश्न विचारले आहेत.
राज्यात मराठा आरक्षण देऊन, मराठा आणि ओबीसींना एकमेकांच्या विरोधात उभे करण्याचे पाप भाजप सरकारने केल्याचा आरोप करण्यात आला आहे. हिंदू महासभेचे अध्यक्ष आनंद दवे यांनी पत्रकार परिषद घेऊन देवेंद्र फडणवीस यांच्यावर आरोप केला आहे.

बाबासाहेब पुरंदरे यांच्याविरोधात हिंसेची भाषा करणाऱ्या किती जणांवर कारवाई करण्यात आली? असा प्रश्न विचारला आहे. यासह १५ प्रश्नांची उत्तरे फडणवीसांनी द्यावी,असे आवाहन हिंदू महासभेकडून करण्यात आले आहे .
राज ठाकरेंच्या सभेनंतर हा वाद राज्यात सुरु झाला होता. राज ठाकरेंनी शरद पवार आणि राष्ट्रवादीवर टीका केली होती. तर राष्ट्रवादीकडून पलटवार करण्यात आला होता. यावेळी जेम्स लेन, बाबासाहेब पुरंदरे आदी विषय पुन्हा काढण्यात आले. यावरच हिंदू महासभेने टीका केली आहे.
आनंद दवे यांनी उपस्थित केलेले प्रश्न
जगमोहन यांच्या काळात काश्मीर मध्ये सर्वाधिक हत्याकांड घडले, त्यांना भाजपने दोन वेळा खासदार कसे केले ?,प्रेषित महंम्मद पैगंबर यांची जयंती सार्वजनिक सुट्टी म्हणून जाहीर केली, केली त्याला भाजपने का विरोध केला नाही ?व्ही पी सिंग सरकारने मंडल आयोग आणला त्याला का विरोध केला नाही ?मराठा ओबीसीत फूट का पाडली ?

Leave a Reply

%d bloggers like this: