कर्वेनागर येथील शितळादेवी मंदीरात चोरी; भाविक बनून आलेल्या चोरट्याने फोडल्या दानपेटया  

पुणे : पुण्यातील कर्वेनगर भागातील प्रसिद्ध शितळादेवी देवस्थानात चोरी झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.भाविक बनून आलेल्या चोरट्याने दानपेटया फोडून यातील रोकड लांपास केली आहे. विशेष म्हणजे मंदिराच्या शेजारीच कर्वेनगर पोलीस चौकी आहे. तरीदेखील चोरी झाल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. कोथरूड येथील कर्वेनगर परिसरात शितळादेवी – भैरवनाथाचं मंदीर असून येथे मोठ्या संख्येने भाविक दर्शनासाठी येत असतात.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एका व्यक्तीने मंदिरात प्रवेश केला. आधी त्याने भाविक बनून हात जोडून दर्शन घेतले आणि नंतर दानपेट्या फोडल्या आहेत. हा संपूर्ण चोरीचा प्रकार मंदिराच्या सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाला आहे.  ४ दानपेट्या फोडून चोरट्याने ७५,००० रुपये लंपास केले आहेत. तसेच मंदिरातील घंटा देखील चोरुन तो पसार झालाय. काही दिवसांपूर्वीच असाच प्रकार कर्वेनगर तसेच हिंजवडी मध्ये असलेल्या मंदिरात घडला होता. यानंतर आता शितळादेवी मंदिरातही चोरी झाल्याने भाविकांमध्ये नाराजी आहे.

याप्रकरणी कोथरूड पोलिस ठाण्यात गुन्ह्याची नोंद झाली असून पोलीस सीसीटीव्ही फूटेजच्या आधारे अधिक तपास करीत आहेत.

Leave a Reply

%d bloggers like this: