राज ठाकरेंनी पुण्यात ‘भोंगा’ बदलला; शहराध्यक्षपदी साईनाथ बाबर

पुणे : मशिदींवरील भोंगे काढण्याच्या राज ठाकरे यांच्या निर्णयाला विरोध करणाऱ्या वसंत मोरे यांना शहराध्यक्ष पदावरून हटवण्याचा निर्णय खुद्द मनसेअध्यक्ष राज ठाकरे यांनी घेतला आहे.
दरम्यान, साईनाथ बाबर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नवीन शहराध्यक्ष असतील, अशी घोषणादेखील राज ठाकरे यांनी केली घोषित केले आहे. राज ठाकरे यांनी मशिदींवरील भोंग्यांवर केलेल्या विधानावर पुण्यात मनसेमध्ये दुफळीचे चित्र निर्माण झाले होते. त्यानंतर वसंत मोरे यांनी पक्षावर नाराजी व्यक्त केली होती.
मशिदीवरील भोंगे आणि हनुमान चालिसा प्रकरण मनसेमधील अंतर्गत वादालाच जास्त कारणीभूत ठरल्याचं दिसून येतंय. पुण्यातील मनसे पदाधिकाऱ्यांमध्ये यासंदर्भात नाराजीनाट्य रंगताना दिसून येत आहे. पुण्यातील मनसेचे शहराध्यक्ष वसंत मोरे यांनी सर्वप्रथम माध्यमांसमोर येत यासंदर्भातील आपली भूमिका मांडली होती. राज ठाकरे यांनी या नाराज कार्यकर्त्यांची नाराजी दूर करण्यासाठी त्यांना आज मुंबईला बोलावून घेतलंय मात्र, यामध्ये शहराध्यक्ष वसंत मोरेंचाच सहभाग नव्हता. एकूणच, राज यांच्या भोंगे प्रकरणावर मोरे यांनी उघडपणे पक्षावर नाराजी व्यक्त केली होती.
साईनाथ बाबर हे नवे शहराध्यक्ष झाल्यामुळे वसंत मोरे यांच्या शहर अध्यक्षपदाची सूत्रे कायमची गेली आहेत.

Leave a Reply

%d bloggers like this: