राज ठाकरेंनी ‘ब्लू प्रिंट’च हरवली – रंगा रचुरे

पुणे : केजरीवाल यांच्या सारखेच प्रेम एकेकाळी महाराष्ट्रात राज ठाकरे यांना मिळाले होते. पण त्यांची ‘ब्लू प्रिंटच’ हरवली, या शब्दात आम आदमी पार्टीचे प्रदेशाध्यक्ष रंगा राचुरे यांनी टीका राज ठाकरे यांच्यावर केली आहे. रंगा रचुरे म्हणाले, ठाकरे यांचे कार्यकर्ते मनस्वी आहेत.तरुण आहेत.चिवट आहेत पण आता संभ्रमित आहेत. त्यांना आता व्हिडीओ लावायचा की बंद करायचा? हे समजेनासे झाल्याची राचुरे यांनी राज ठाकरेंवर केली आहे. 

रंगा रचुरे म्हणाले ,आम आदमी पार्टीने अत्यल्प काळात दोन राज्यात मुख्यमंत्रीपद मिळवले आहे. त्यामुळे आज महाराष्ट्रातील तरुणांच्या मनात केजरीवाल यांच्याविषयी आकर्षण आहे. तरुणांना राज ठाकरे यांचेदेखील आकर्षण आहे पण कालच्या सभेने इंजिन कुठल्या रुळावर चालणार की जमिनीवर खडखडाट करत बंद पडणार असा प्रश्न आहे, अशी प्रतिक्रिया राचुरे यांनी दिली आहे.
दिल्लीपाठोपाठ पंजाब विधानसभा निवडणुकीत आपला मतदारांचा मोठा प्रतिसाद मिळाला. पंजाबी जनतेने आपला पंजाबमध्ये थेट सत्तेवर बसविले.त्यामुळे दिल्लीचे मुख्यमंत्री आणि ‘आप’चे राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल यांचा देशभर बोलबाला आहे. मध्यमवर्गीय व कनिष्ठ मध्यमवर्गीयांमध्ये तसेच तरूणांमध्येही केजरीवाल यांच्याविषयी उत्सुकता आहे.राज ठाकरे यांचेही तरूणांना आकर्षण आहे. मात्र, गुढी पाडव्यानिमित्त त्यांनी काल केलेल्या भाषणातून त्यांच्या राजकीय भूमिकेविषयी त्यांच्या पाठीराख्यांमध्ये आणखी संभ्रम निर्माण झाला आहे. असे रंगा रुचूरे म्हणाले.

पंजाबच्या निकालानंतर केजरीवाल यांना राज्यातूनही प्रतिसाद वाढण्याची शक्यता आहे. त्यादृष्टीने आपच्या महाराष्ट्र संघटनेतही तयारी सुरू करण्यात आली आहे.राज्यातल्या येत्या महापालिका निवडणुका तसेच त्यानंतर येणाऱ्या लोकसभा व विधानसभा निवडणुका समोर ठेऊन पक्षाकडून तयारी करण्यात येत आहे. सामान्यांच्या छोट्या-छोट्या प्रश्‍नांना घेऊन आपच्यावतीने यापुढच्या काळात रस्त्यावरची लढाई लढली जाणार आहे. असा इशारा रचुरे यांनी दिला.

Leave a Reply

%d bloggers like this: