Tuesday, June 16, 2026
Latest NewsPUNETOP NEWS

आज दिवसभरात पुणे शहरात 10 नवीन कोरोना रुग्णांची नोंद 

पुणे : राज्यभरातील कोरोना रुग्ण संख्या कमी होत असल्याच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने सर्व कोरोना निर्बंध काढून टाकले आहेत. त्यामुळे आज राज्यभर गुढी पाडव्याचा सण मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला. तर दुसरीकडे आज दिवसभरात पुणे शहरात नवीन 10 कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. तसेच 15 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

पुणे शहरात आजपर्यंतची एकूण कोरोना रुग्ण संख्या 6 लाख 61 हजार 954 इतकी झाली आहे. यापैकी 6 लाख 52 हजार 464 रुग्ण बरे झाले आहेत. दिलासादायक बाब म्हणजे पुण्यात गेल्या 24 तासात एकाही कोरोना रुग्णांच्या मृत्यूची नोंद नाही. तर आतापर्यंत पुणे शहरात 9349 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. पुणे शहरामध्ये सध्या 131अ‍ॅक्टिव्ह रुग्ण आहेत. यामध्ये 3 रुग्ण गंभीर आहेत. आज दिवसभरात शहरातील विविध केंद्रांवर 2004 स्वॅब तपासण्या करण्यात आल्या आहेत, अशी माहिती पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिली  आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading