Monday, October 5, 2026
Latest NewsPUNE

भाजप कडून केंद्रीय तपास यंत्रणांचा दुरुपयोग सुरू असून जनता याला कंटाळली आहे – नाना पटोले

पुणे : केंद्रीय यंत्रणांचा वापर करून भाजप विकास आघाडी सरकार मधल्या मंत्र्यांवर कारवाई करत आहे. त्यामुळे महाविकास आघाडी मधल्या मंत्र्यांवर मोठ्या प्रमाणात कारवाया होत आहेत. भाजप कडून केंद्रीय तपास यंत्रणांचा दुरुपयोग करणे सुरू असून जनता या सगळ्याला कंटाळली आहे, असे वक्तव्य काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आज पुण्यात केले.

काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्यावर पक्षाने जी जबाबदारी दिली ती ते संभाळू शकत नाही, अशी टीका विरोधकां कडून होत आहे. यावर प्रतिक्रिया देताना नाना पटोले म्हणाले, राहुल गांधी यांच्याकडे व्हिजन आहे. 2019 च्या महामारी ची सूचना राहुल गांधींनी दिली होती, पण त्यांची टिंगलटवाळी केली गेली. यादेशाला पुढच्या काळात काँग्रेस सांभाळू शकते. भाजपच्या कामाला जनता कंटाळली आहे. देशपातळीवर, भाजपला मोडीत काढायचे असल्यास काँग्रेसच पर्याय आहे, असेही नाना पटोले म्हणाले.

काँग्रेसच्या 25 आमदारांना सोनिया गांधींना भेटायचे आहे. त्यामुळे त्यांनी सोनिया गांधींना भेटण्यासाठी वेळ मागितला आहे .त्यावर नाना पटोले म्हणाले, हे 3 पक्षाचे सरकार आहे, थोडं कमी जास्त होतं. आमदार आपल्या मतदार संघात काम करतात त्यांना पक्ष अध्यक्षांना भेटायची इच्छा असते ते भेटू शकतात.

कोकणातल्या स्थानिक लोकांनी नाणार प्रकल्पाला विरोध केला आहे. त्यामुळे महाविकास आघाडी सरकार व भाजपमध्ये काही वाद सुरू आहे. यावर नाना पटोले म्हणाले, कोकणाला निसर्गाने भरभरून दिले पण पाहिजे तसा विकास तिथे झाला नाही. नाणार बद्दल गैरसमज होतील असं वातावरण तयार झाले आहे. सरकारने यासाठी पुढाकार घ्यावा लोकांचे गैरसमज दूर करावे.तरीही लोकांचा विरोध असेल तर विदर्भात जागा आहे. तिथे घेऊन जाऊ शकतो, पश्चिम महाराष्ट्रात जागा आहे. राज्याच्या बाहेर जाऊ नये याची काळजी घ्यावी. नाणारला पाठिंबा आहे का? यावर निसर्गाला कुठेही हानी पोहचणार नाही असं मी ऐकलंय, असे नाना पटोले म्हणाले.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading