Wednesday, June 17, 2026
Latest NewsPUNE

विद्यार्थ्यांसाठी असणाऱ्या सुविधांचा बोजवारा, तरीही विद्यापीठ प्रशासन मात्र गप्प – अभाविप

पुणे: सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ परिसर मागील काही आठवड्यापासून प्रत्यक्ष सुरू झाला असून विद्यार्थ्यांच्या उपस्थितीने परिसर गजबजला आहे. ऑफलाईन क्लास सुरू झाल्यापासून विद्यार्थी मोठ्या संख्येने वर्गात प्रत्यक्ष उपस्थित राहत आहेत. मात्र या विद्यार्थ्याना विद्यापीठात कुठल्याही सोयी सुविधा योग्य पद्धतीने मिळत नाहीत. खानावळी मधील भोजनाचा दर्जा खालावलेला आहे, वसतिगृहात स्वच्छ्ता नाही, मुलींना वसतिगृहात खानावळ नाही, झेरॉक्स सेंटर बंद आहे तरीही प्रशासनाचे याकडे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे विद्यार्थ्याना या समस्यांना सामोरे जावे लागत असून ह्या समस्या तत्काळ सोडवून विद्यार्थ्याना न्याय द्यावा अशी मागणी अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, पुणे कडून करण्यात आली.
विद्यार्थ्यांच्या मागण्या –
१) विद्यार्थिनी वसतिगृह स्वच्छ्ता व दुरुस्ती करावी आणि मेस सुविधा सुरू करावी.
२) विद्यापीठातील सर्व खानावळी मधील भोजनाचा दर्जा वाढवावा.
३) विद्यापीठातील बंद पडलेले इंटरनेट व झेरॉक्स सेंटर सुरू करावे.
४) वसतिगृह १०० टक्के क्षमतेने तत्काळ सुरू करून गरजू विद्यार्थ्यांना प्रवेश द्यावा.
वरील सर्व मागण्यावर योग्य कार्यवाही करून विद्यार्थी हिताचा निर्णय घ्यावा अशी मागणी कुलगुरू डॉ. नितीन करमळकर यांच्याकडे करण्यात आली. यावर प्रशासन योग्य तोडगा काढेल व प्रश्न सोडवले जातील असे कुलगुरूंनी यावेळी विद्यार्थ्याना सांगितले. जर सादर मागण्या तत्काळ सोडवल्या नाहीत तर अभाविप तीव्र स्वरूपाचे आंदोलन करेल,असा इशारा यावेळी उपस्थित अभाविप कार्यकर्त्यांनी दिला.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading