fbpx
Sunday, June 2, 2024
Latest NewsPUNETOP NEWS

आज दिवसभरात पुणे शहरात फक्त 7 कोरोना रुग्ण

पुणे :  पुणे शहरामध्ये  कोरोनाचे  रुग्ण  रोज कमी  सापडत आहे. आज शहरात नवीन रुग्णांची संख्या   खुप कमी आढळुन आली आहे. शहरामध्ये कोरोनाबाधित रुग्ण संख्या कमी  होत आहे.  त्यामुळे पुणेकरांना दिलासा मिळत आहे. आज दिवसभरात पुणे शहरात एकदम कमी फक्त  नवीन 7 कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. तर 12 रुग्णा  डिस्चार्ज देण्यात आला आहे. 

पुणे शहरात आजपर्यंत संख्या 6लाख 61हजार 847इतकी झाली आहे .यापैकी 6 लाख52 हजार 388 रुग्ण बरे झाले आहेत. दिलासादायक बाब म्हणजे पुण्यात गेल्या 24 तासात 1 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.तर आतापर्यंत पुणे शहरात 9 हजार 349 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. पुणे शहरामध्ये सध्या 110 अ‍ॅक्टिव्ह रुग्ण आहेत. यामध्ये 1रुग्ण गंभीर आहेत.आज दिवसभरात शहरातील विविध केंद्रांवर 1318 स्वॅब तपासण्या करण्यात आल्या आहेत, अशी माहिती पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिली आहे.
 

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading