S. Balan Trophy – पुनित बालन ग्रुप संघ, केदार जाधव क्रिकेट अॅकॅडमी संघांची विजयी कामगिरी !!
मुंढवा येथील लिजंडस् स्पोर्टस् क्लब मैदानावर सुरू असलेल्या स्पर्धेत सागर सावंत याच्या अष्टपैलू खेळीच्या जोरावर पुनित बालन ग्रुप संघाने गॅरी कर्स्टन क्रिकेट अॅकॅडमी संघाचा ५४ धावांनी पराभव करून स्पर्धेत पहिल्या विजयाची नोंद केली. पुनित बालन ग्रुप संघाने पहिल्यांदा फलंदाजी करताना २० षटकात १८८ धावांचे आव्हान उभे केले. यामध्ये ऋषभ राठोड (५४ धावा), सागर सावंत (नाबाद ४१ धावा), धनराज शिंदे (नाबाद ३९ धावा) आणि ऋतुराज वीरकर (३८ धावा) यांनी संघाच्या डावाला आकार दिला. याला उत्तर देताना गॅरी कर्स्टन क्रिकेट अॅकॅडमीचा डाव १३४ धावांवर मर्यादित राहीला. विजयी संघाकडून सागर सावंत (३-२४) आणि पुनित बालन (३-३४) अचूक गोलंदाजी केली.
वैभव विभूते याच्या भेदक गोलंदाजीच्या जोरावर केदार जाधव क्रिकेट अॅकॅडमी संघाने गाडगे अँड कंपनी संघाचा ६ गडी राखून पराभव करून सलग दुसरा विजय मिळवला. पहिल्यांदा फलंदाजी करताना गाडगे अँड कंपनी संघाने २० षटकात १२७ धावांचे आव्हान उभे केले. अजित राज (२६ धावा) आणि शारीक पेटकर (२१ धावा) यांनी छोट्या खेळी केल्या. वैभव विभूते याने १५ धावात ४ गडी बाद करून चकमदार गोलंदाजी केली. दुसर्या बाजुने अक्षय चव्हाण याने २१ धावात ४ गडी टिपले. हे आव्हान केदार जाधव क्रिकेट अॅकॅडमी संघाने १६.३ षटकात व ४ गडी गमावून पूर्ण केले. आकाश पाटील (४९ धावा), दिग्वीजय जाधव (३१ धावा) आणि यश घोडगे (२५ धावा) यांनी संघाला सहज विजय मिळवून दिला.